बेरोजगारी वाढली! नोकरी लावतो म्हणून दोघांची 'एवढ्या' लाखांना फसविले  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

job treated

मारुती सोनकरविरुध्द फसवणुकीचा गुन्हा 
सहायक विस्तार अधिकारी उस्मानाबाद पंचायत समितीत वर्ग दोनची नोकरी लावतो म्हणून मारुती बिरण्णा सोनकर (रा. कल्लप्पावाडी, ता. अक्‍कलकोट) याने पाच लाख रुपयाला फसविल्याची फिर्याद प्रिती प्रेमसिंह बायस (रा. विश्‍वनगर, विजयूपर रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. मुलाची शैक्षणिक कागदपत्रे, शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊनही नोकरी न लावता पाच लाख रुपये परत दिले नाहीत. पैसे मागण्यासाठी घरी गेल्यानंतर मी रुग्णालयात असून घरातून निघून जावा, असे म्हणून दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  

बेरोजगारी वाढली! नोकरी लावतो म्हणून दोघांची 'एवढ्या' लाखांना फसविले 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील शिवशंकर बसप्पा रामपुरे यांच्या मुलाला नोकरी लावतो म्हणून सोलापुरातील दहिटणे रोडवरील शहाणे वाडा येथील किसन माणिकराव पोतदार यांनी फसविल्याची फिर्याद रामपुरे यांनी जोडभावी पोलिसांत दिली. 

शिवशंकर रामपुरे आणि किसन पोतदार हे वर्गमित्र आहेत. रामपुरे महसूल विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर कामानिमित्त जिल्हा परिषदेत गेल्यावर दोघांची भेट झाली. मुलाचे शिक्षण पूर्ण झाले, परंतु तो नोकरीच्या शोधात असल्याचे रामपुरे यांनी पोतदार याला सांगितले. त्यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गट ब आणि गट क या संवर्गातील पदासाठी जागा निघाल्या असून कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करण्यास पोतदार याने त्यांना सांगितले. अर्ज केल्यानंतर हॉल तिकीट आल्याची बातमी रामपुरे यांनी पोतदार याला दिली. पेपरसाठी मुलाला पाठवा, बाकीचे मी बघून घेतो, पेपरसाठी कितीही गुण पडले, तरी तोंडी परीक्षेत पास करुन मुलाची ऑर्डर काढतो, अशी हमी पोतदार याने घेतली. त्यासाठी दहा लाखांची मागणी केली आणि ठरल्याप्रमाणे रामपुरे यांनी आठ लाख रुपये दिले. मात्र, नोकरीचे काम न झाल्याने रामपुरे यांनी पोतदार याला पैशाची मागणी केली. मात्र, त्याने न वटणारा एका खासगी बॅंकेचा धनादेश दिला. नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

मारुती सोनकरविरुध्द फसवणुकीचा गुन्हा 
सहायक विस्तार अधिकारी उस्मानाबाद पंचायत समितीत वर्ग दोनची नोकरी लावतो म्हणून मारुती बिरण्णा सोनकर (रा. कल्लप्पावाडी, ता. अक्‍कलकोट) याने पाच लाख रुपयाला फसविल्याची फिर्याद प्रिती प्रेमसिंह बायस (रा. विश्‍वनगर, विजयूपर रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. मुलाची शैक्षणिक कागदपत्रे, शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊनही नोकरी न लावता पाच लाख रुपये परत दिले नाहीत. पैसे मागण्यासाठी घरी गेल्यानंतर मी रुग्णालयात असून घरातून निघून जावा, असे म्हणून दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  

loading image
go to top