चेसी क्रॅक 99 बसचे पुन्हा लेखापरीक्षण ! आयुक्‍तांनी पाठविला राज्य सरकारला अहवाल

11_3_20_20Copy (1) - Copy.jpg
11_3_20_20Copy (1) - Copy.jpg

सोलापूर : शहराचा विस्तार वाढला, लोकसंख्याही वाढली, मात्र महापालिकेच्या परिवहन बसची संख्या वाढण्याऐवजी कमीच झाली. सध्या विविध मार्गांवर अवघ्या 11 बस धावत असून दररोज सुमारे 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. रिक्षांच्या तुलनेत परवडणारी सेवा देणारी परिवहन सेवा सध्या अडचणीत सापडली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा चेसी क्रॅक बसच्या चौकशीसाठी लोकल फंडातून ऑडिटर नियुक्‍त करुन फेरचौकशी व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

नगरविकासच्या माध्यमातून निघेल आदेश
महापालिकेचा परिवहन उपक्रम अडचणीतून बाहेर निघत असतानाच चेसी क्रॅक बसमुळे पुन्हा डबघाईला आला. सध्या 99 चेसी क्रॅक बस जागेवरच थांबून आहेत. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी कर्मशाळा व्यवस्थापकांच्या माध्यमातून त्याचा प्राथमिक अहवाल तयार केला. तो अहवाल आयुक्‍तांनी वित्त विभागाच्या लोकल फंडातील ऑडिटर विभागाला पाठविला. आता तो नगरविकास विभागाला पाठविला जाणार असून त्यानंतर चेसी क्रॅक बसची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होईल. दरम्यान, ऍड. मराठे यांना महापालिकेने नियुक्‍त केले असून त्यांच्या माध्यमातून यासंदर्भात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

परिवहनच्या ताफ्यात सध्या 29 बस असून त्यातील 11 बस आरोग्य विभागाला तर सात बसमध्ये मोबाइल क्‍लिनिक सुरु केले आहे. कोरोना काळात जागेवरच थांबून असलेली परिवहन सेवा 10 ऑगस्टपासून सुरु झाली. सुरवातीच्या काळात प्रतिकिलोमीटर तीन रुपयांचे उत्पन्न मिळत होते. आता प्रतिकिलोमीटर 44 रुपयांचा खर्च असून उत्पन्न मात्र, 24 रुपयांपर्यंत आले आहे. अडचणीतील परिवहनला सुस्थितीत आणण्यासाठी आणि खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेला नव्या ईलेक्‍ट्रिक बस द्याव्यात, अशी मागणी परिवहन सभापती जयराज साळुंखे यांनी खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यानुसार 32 सिटर 50 ईलेक्‍ट्रिक बस मिळणार आहेत. चार वर्षे वॉरंटी असून नव्या युवकांना दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीअंतर्गत मंजूर असलेल्या दोनपैकी एक चार्जिंग सेंटर सात रस्ता येथे बसविले जाणार असल्याची माहिती परिवहन सभापती जयराज साळुंखे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


शहराची सद्यस्थिती
एकूण अंदाजित लोकसंख्या
12 लाख
रिक्षांची संख्या
17,928
दुचाकी
7.30 लाख
परिवहन बस
11
मिळणाऱ्या ईलेक्‍ट्रिक बस
50 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com