esakal | तरुणाचे स्टार्टअप ! 'हुडलर'मुळे ज्येष्ठांची थांबली धावपळ
sakal

बोलून बातमी शोधा

20200921_184850.jpg

स्टार्टअपची अशी सूचली कल्पना 
बेंगलोरमध्ये एम-टेकचे शिक्षण घेत असताना रुममधील एक मशिन दुरुस्तीसाठी इलेक्‍ट्रिशियनची गरज होती. त्यावेळी चौकशी केली, परंतु प्रत्येकांनी वेगवेगळे दर सांगितले. त्यांना आपली भाषाही येत नव्हती. हीच समस्या माझ्या मित्रालाही निर्माण झाली. घरातील इलेक्‍ट्रिक उपकरणे दुरुस्तीसह घरपोच सेवा देण्यासाठी अनेकांकडून नागरिकांची लूट केली जाते, हे लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून आपण सेवा पुरवठादार म्हणून स्टार्टअप सुरु करण्याची कल्पना सूचली. त्यानंतर आपल्याकडील बहुतांश सुशिक्षित लोक इंग्रजी ऍप तथा वेबसाईटला पसंती देतात. त्यामुळे मी माझ्या स्टार्टअपचे नाव 'हूडलर' ठेवले. 

तरुणाचे स्टार्टअप ! 'हुडलर'मुळे ज्येष्ठांची थांबली धावपळ

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : घरातील इलेक्‍ट्रिक वस्तू दुरुस्तीसह कौटुंबिक 21 प्रकारच्या सुविधा घरपोच देऊन नागरिकांची विशेषत: ज्येष्ठांची लूट थांबवावी, नोकदारांसह अन्य नागरिकांना तत्काळ घरपोच खात्रीशीर सेवा मिळावी, यासाठी सोलापुरातील अझहर बागवान या तरुणाने बेंगलोरमधील अनुभवावरुन नवा स्टार्टअप व्यवसाय ('हुडलर') सुरु केला आहे. मुले शिक्षण तथा नोकरीनिमित्त परजिल्ह्यात तथा परदेशात गेल्याने एकटे पडलेल्या ज्येष्ठांना 'हुडलर'चा मोठा लाभ होऊ लागला आहे.

स्पर्धेच्या काळात नोकदार कुटुंबांतील सदस्यांना घरातील इलेक्‍ट्रिक उपकरण दुरुस्ती करणे, घराची स्वच्छता करणे, वाहनाची दुरुस्ती तथा स्वच्छता करणे, ब्यूटी पार्लर, गिफ्टसह अन्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यासह घरातील इलेक्‍ट्रिक यंत्रे, उपकरणे बंद पडली, सुतारकाम, प्लंबिंग, पेस्ट कंट्रोलसह अन्य कामांमधील सर्वसामान्यांची लूट थांबावी या हेतूने अझहरने हा नवा व्यवसाय सुरु केला. हा स्टार्टअप लॉकडाउनमध्येही तग धरुन आहे. या व्यवसायाचा आता इंदौर, पुणे, मुंबई, नाशिकसह परराज्यातही विस्तार करायचा आहे. त्यासाठी बॅंकांच्या माध्यमातून अर्थसहाय मिळविण्याचा अझहरचा प्रयत्न आहे. आगामी काळात डॉक्‍यूमेंटेशन (सर्व प्रकारची कागदपत्रे काढून घरपोच देणे), हेल्थ ऍण्ड फिटनेस, वेडिंग ऍण्ड इव्हेंट अशा सेवा पुरविण्याचे नियोजन असल्याचे त्याने सांगितले. लोकांना कोणत्याही त्रासाविना कमी वेळेत, कमी खर्चात घरपोच सेवा मिळावी, हाच त्यामागचा हेतू आहे. कॉल, ऍप, व्हॉटस्‌अप, ऍन्ड्राईड ऍपल व्हर्जन आणि वेबसाईटच्या माध्यमातून ही सेवा कोणीही मिळवू शकेल, असा विश्‍वास अझहर बागवानने 'सकाळ'च्या माध्यमातून व्यक्‍त केला. 

'हूडलर'च्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवा 
केक, गिफ्ट गॅलरी, कार्ड, फूड्‌सची घरपोच सेवा, इलेक्‍टिशिन, प्लंबर, सुतारकाम, लॅपटॉप, संगणक, प्रिंटर, एसीची दुरुस्ती, पेस्ट कंट्रोल, पाणी टॅंकर स्वच्छता, दुचाकी, कार वॉशिंग, सर्व्हिसिंग, रिपेअरिंग आणि टोईंग आणि मेकअप, स्पा, सलूनचीही घरपोच सेवा दिली जाते. या सेवांचा लाभ जुळे सोलापूरसह शहरातील 27 हजारांहून अधिक ज्येष्ठांसह इतरांना होत आहे. मागील तीन वर्षांत हा 'हुडलर' सोलापुरातील तीन ते साडेतीन हजार कुटुंबापर्यंत पोहचला असून त्यात विशेषत: जुळे सोलापुरातील सर्वाधिक कुटुंबांचा समावेश आहे. 


स्टार्टअपची अशी सूचली कल्पना 
बेंगलोरमध्ये एम-टेकचे शिक्षण घेत असताना रुममधील एक मशिन दुरुस्तीसाठी इलेक्‍ट्रिशियनची गरज होती. त्यावेळी चौकशी केली, परंतु प्रत्येकांनी वेगवेगळे दर सांगितले. त्यांना आपली भाषाही येत नव्हती. हीच समस्या माझ्या मित्रालाही निर्माण झाली. घरातील इलेक्‍ट्रिक उपकरणे दुरुस्तीसह घरपोच सेवा देण्यासाठी अनेकांकडून नागरिकांची लूट केली जाते, हे लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून आपण सेवा पुरवठादार म्हणून स्टार्टअप सुरु करण्याची कल्पना सूचली. त्यानंतर आपल्याकडील बहुतांश सुशिक्षित लोक इंग्रजी ऍप तथा वेबसाईटला पसंती देतात. त्यामुळे मी माझ्या स्टार्टअपचे नाव 'हूडलर' ठेवले. 


अझहर बागवान म्हणाला... 

  • दोन लाखांच्या स्टार्टअपची तीन वर्षांत 21 लाखांची उलाढाल 
  • पुणे, सोलापूर, बेंगलोर येथील नागरिकांना मिळते घरपोच सेवा 
  • 'हूडलर'कडून मिळतात होम डिलिव्हरी, होम मेन्टेनन्स्‌, होम क्‍लिनिंग, ब्यूटी आणि ऑटोमोबाईलच्या 21 सेवा 
  • वेळेत घरपोच सेवा, विश्‍वासार्हता, उत्कृष्ट काम, प्रशिक्षित कामगार हीच 'हूडलर'ची वैशिष्टे 
  • - 'मदर्स डे' निमित्त हूडलर पोहचला कॅनडा, कुवेत (सौदी अरेबिया) या देशांत 
  •  

इथे साधा संपर्क 
सामाजातील विविध क्षेत्रात असलेल्या कोणत्याही समस्यांवर ठोस उपाय शोधून शहर- जिल्ह्यातील ज्या कोणी स्टार्टअप सुरु केले आहे. त्यांनी 9921873895 या क्रमांकावर संपर्क साधावा.