
झाडे ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे संरक्षण करणे हे आपले काम आहे. मंगळवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वन क्षेत्राला आगली. हे आग विझवण्याचे काम तिसंगी येथील चिमुकल्यांनी हातांना चटके बसत असतानाही मोठ्या धाडसाने केले. ही आग विझली नसती तर किती हजार झाडे जळून भस्मसात झाली असती, याची कल्पना केल्यास या चिमुकल्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
तिसंगी (सोलापूर) : तिसंगी (ता. पंढरपूर) परिसरात फॉरेस्ट विभागाचे 53 हेक्टर क्षेत्र असून, मंगळवारी (ता. 1) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारात या फॉरेस्टला आग लागल्याने आगीत दोन हजार रोपे जळून खाक झाली तर 38 हजार रोपे वाचविण्यात यश आले आहे. आग विझविण्याचे मोठे काम तिसंगीतील बाल चिमुकल्यांनी केले आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, हे समजू शकले नाही. याचा तपास वन अधिकारी करीत आहेत.
झाडे ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे संरक्षण करणे हे आपले काम आहे. मंगळवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वन क्षेत्राला आगली. हे आग विझवण्याचे काम तिसंगी येथील चिमुकल्यांनी हातांना चटके बसत असतानाही मोठ्या धाडसाने केले. ही आग विझली नसती तर वणवा पेटून किती हजार झाडे जळून भस्मसात झाली असती, याची कल्पना करवणार नाही. या चिमुकल्यांचे कार्य कौतुकास्पद असेच आहे.
ही आग विझवणारे ऍड. वैभव चंदनशिवे यांच्यासह निखिल कांबळे, सिद्धार्थ चंदनशिवे, प्राजक्ता चंदनशिवे, सायली चंदनशिवे, प्रथमेश चंदनशिवे, आर्यन बाबर या चिमुकल्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या चिमुकल्यांना शासकीय यंत्रणेने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
माझ्या घराच्या जवळ वनक्षेत्र असून, अचानक आग लागल्याचे दिसले. वनविभागाच्या अधिकारी वर्गास फोन केला, पण एकही अधिकारी आला नाही. मी लहान चिमुकल्यांना घेऊन आग विझवली. हजारो रापे वाचवली.
- ऍड. वैभव चंदनशिवे, तिसंगी
आग विझवत असताना चटके बसत होते. पण आग विझवली नाही तर जंगल जळून जाईल, म्हणून धाडस करून झाडांच्या फांद्यांनी आग विझवली.
- प्राजक्ता चंदनशिवे, तिसंगी
तिसंगी परिसराला वरदान ठरलेले उंबरगाव, शिरभावी, हलदहिवडी परिसरात मोठे वनक्षेत्र आहे. यांचे संरक्षण करणे अधिकारी वर्गाची जबाबदार असून, याचे पालन होत नाही. त्यामुळे आग लागली. अधिकारी वर्गाचे या परिक्षेत्राकडे दुर्लक्ष आहे.
- प्रा. अशोक पवार, वृक्षप्रेमी, तिसंगी
संपादन : श्रीनिवास दुध्याल