esakal | बार्शीत नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन कडकडीत बंद पाळला

बोलून बातमी शोधा

Citizens and traders in Barshi observed spontaneous support and observed strict closure.jpg

बार्शी शहर अन् तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिक देखील धास्तावले आहेत.

बार्शीत नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन कडकडीत बंद पाळला
sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाउनला शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. शनिवारी दिवसभर संचारबंदी असल्याने कामांव्यतिरिक्त नागरिक दिसत नव्हते, पूर्ण शुकशुकाट होता. औषधांच्या दुकानांशिवाय कोणताही व्यवसाय सुरु नव्हता. नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन कडकडीत बंद पाळला.

बार्शीत चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा खून

बार्शी शहर अन् तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिक देखील धास्तावले आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे आता प्रत्यक्षात जाणवत आहे. तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, त्यांच्या पत्नी संयोजिनी निंबाळकर कोरोनाबाधित आढळल्याने शहरवासियांचे धाबे दणाणले आहे.

आगीमुळे पाच दुकाने भस्मसात ! पंधरा दिवसातील जळीताची दुसरी घटना

पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, मुख्याधिकारी अमिता दगडे - पाटील यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे शुक्रवारी रात्री आठपासून प्रशासकीय यंत्रणा राबवली आहे. शनिवारी पांडे चौकात पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे पथक नेमण्यात येऊन येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत होती. अत्यावश्यक सेवेशिवाय कोणी आढळले तर दंड आकारण्यात येत होता. शनिवारी शहरातील सर्व उपहारगृहे, बेकरी, हातगाडीवाले, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आल्याने पूर्ण शुकशुकाट होता.