
गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरून 100, 50 व 10 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून एप्रिल महिन्यापासून टप्प्या - टप्प्याने बंद होणार असल्याचे संकेत रिझर्व बॅंकेने दिले असले, तरी बॅंकांना मात्र याबाबत तशा सूचना आलेल्या नाहीत. तरीही ग्रामीण भागात मात्र यामुळे जुन्या नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात निघाल्या आहेत.
केत्तूर (सोलापूर) : गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरून 100, 50 व 10 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून एप्रिल महिन्यापासून टप्प्या - टप्प्याने बंद होणार असल्याचे संकेत रिझर्व बॅंकेने दिले असले, तरी बॅंकांना मात्र याबाबत तशा सूचना आलेल्या नाहीत. तरीही ग्रामीण भागात मात्र यामुळे जुन्या नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात निघाल्या आहेत. त्यामुळे जुन्या, फाटक्या, तुटक्या, जीर्ण झालेल्या नोटांचा समावेश व्यवहारात होत असल्याने व्यावसायिकांची मात्र पंचाईत झाली आहे. काही ठिकाणी ग्राहक व व्यापारी यांच्यात हमरीतुमरीचे प्रकारही घडू लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अचानकपणे रात्री बारा वाजता नोटाबंदी जाहीर केल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला होता. सध्या जुन्या नोटा बंद होणार व चलनातून रद्द होणार, अशा बातम्या केवळ प्रसार माध्यमातून चालू आहेत. परंतु, त्यामुळे ग्राहक वर्ग जुन्या 100, 50, 20 व 10 रुपयांच्या नोटांचा बॅंकेमध्ये भरणा करीत आहेत.
- रघुवेंद्र कुलकर्णी,
शाखा अधिकारी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, केत्तूर
जुन्या नोटा बंद करण्यात येणार अशा सूचना बॅंकांना देण्यात आलेल्या नाहीत. शासनाचे तशा कोणत्याही प्रकारचे आदेश दिलेले नाहीत.
- डी. एस. गोरे,
शाखा अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, केत्तूर
नोटा बंद होणार ही केवळ अफवा असल्याने सध्या तरी ग्राहकांकडून बिनदिक्कतपणे 100, 50, 20 व 10 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारत आहे.
- दिनेश माने,
व्यावसायिक, केत्तूर
काही वर्षांपूर्वी नोटाबंदी झाल्यानंतर नव्याने 100, 50, 20 तसेच 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या असल्या तरी, जुन्या नोटाही चलनात सु। होत्या व आहेत. या नोटा बंद करण्या अगोदर बॅंकेत जमा झाल्यानंतर या जुन्या नोटांऐवजी ग्राहकांना नवीन नोटा बॅंकांनी ग्राहकांना द्याव्यात.
- श्रीकांत साखरे,
राजुरी
संपादन : श्रीनिवास दुध्याल