सोलापूर शहरात 1120 चाचण्यांमध्ये आढळले 30 नवे कोरोनाबाधित 

प्रमोद बोडके
Thursday, 26 November 2020

उत्कर्ष नगर मधील 66 वर्षिय महिलेचा मृत्यू 
आजच्या अहवालामध्ये मृत दाखवण्यात आलेली व्यक्ती ही विजापूर रोडवरील उत्कर्ष नगर परिसरातील 66 वर्षीय महिला आहे. या महिलेला 28 ऑक्‍टोबर रोजी दुपारी दोन वाजता अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 24 नोव्हेंबर रोजी या महिलेचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 120 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 90 अहवाल निगेटिव्ह आले असून 30 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी 17 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंदही अजच्या अहवालात घेण्यात आली आहे. 

सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता दहा हजार 267 झाली आहे. कोरोना मुळे आतापर्यंत 561 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 448 जणांवर उपचार सुरू आहेत. सोलापूर महापालिका हद्दीतील नऊ हजार 258 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. सोलापूर शहरातील 108 जणांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 95 जण सध्या इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये आहेत. 

बुधवार पेठ, वसंत विहार, वीरशैवनगर, रेल्वे लाइन्स, मरीआई चौकातील इंद्रधनु, सिद्धेश्वर पेठ, विजापूर रोडवरील देशमुख नगर, लिमयेवाडी परिसरातील जगदंबा मंदिराजवळ, शुक्रवार पेठ, विजापूर रोडवरील पत्रकार भवन जवळ, महालक्ष्मी सोसायटी, मोदीखाना, रेल्वे कॉलनी येथील गणेश हॉल जवळ, होटगी रोड, कर्णिक नगर, शेळगी येथील मित्र नगर, काळजापूर मारुती मंदिराजवळ, बालाजी सोसायटी, होटगी रोडवरील नवोदय नगर, विजापूर रोड वरील कोटणीस नगर, विजापूर रोड वरील राजेश्वर नगर, स्वामी विवेकानंद नगर, चंडक विहार, सम्राट चौकातील हरपदम रेसिडेन्सी या ठिकाणी आज कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the city of Solapur, 1120 tests found 30 new corona