सोलापूर शहरात 312 चाचण्यांमध्ये सापडले 28 कोरोना बाधित 

प्रमोद बोडके
Thursday, 15 October 2020

ऍक्‍टिव 730 रुग्णावर उपचार 
सोलापूर महापालिका हद्दीतील 511 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 730 जणांवर उपचार सुरू आहेत. सात हजार 925 आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. 

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 312 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामधील 284 अहवाल निगेटिव्ह आले असून 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 14 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार 32 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

आजच्या अहवालांमध्ये एकही व्यक्ती मृत दाखविण्यात आलेला नाही. सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 9 हजार 166 झाली आहे.आज नव्याने आढळलेल्या बाधितामध्ये कुंभार वेस जोडभावी पेठ, भवानी पेठेतील मराठा वस्ती, शांतीनगर देसाई नगर, अक्कलकोट रोड वरील गांधीनगर, चौपाड, आसरा येथील महाराष्ट्र बॅंक कॉलनी, विजापूर रोड, रेल्वे लाइन्स, शेळगी, नवीन आरटीओजवळ, होटगी रोड, देगाव, होटगीवरील काजल नगर, एकता नगर, विजापूर रोडवरील नम्रता नगर, कुमठा नाका, बाळीवेस येथील मराठा वस्ती, भवानी पेठ येथील वर्धमान नगर, भवानी पेठेतील नागणे अपार्टमेंट, होमकर नगर जवळ, वामन नगर, मजरेवाडीतील भारत माता नगर, अभिषेक नगर, विश्राम हाउसिंग सोसायटी या ठिकाणी नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the city of Solapur, 28 corona infections were found in 312 trials