सोलापूर शहरात 881 अहवालामध्ये सापडले 33 नवे कोरोनाबाधित 

प्रमोद बोडके
Saturday, 21 November 2020

कोरोना चाचणीचे 358 अहवाल प्रलंबित 
सोलापूर महापालिका हद्दीतील 358 कोरोना चाचणी अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. महापालिका हद्दीतील 1 लाख 2 हजार 808 कोरोना चाचण्या आत्तापर्यंत निगेटिव्ह आल्या आहेत. महापालिका हद्दीतील 106 जण सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्युन्शनल क्वारंटाईनमध्ये सध्या 77 जण आहेत. 

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 881 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 848 अहवाल निगेटिव्ह आले असून 33 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी 48 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजच्या अहवालामध्ये महापालिका हद्दीतील एकाही व्यक्तीचा मृत्यूची नोंद नाही. 

सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 10 हजार 108 झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 557 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 494 जणांवर उपचार सुरू आहेत. सोलापूर महापालिका हद्दीतील 9 हजार 57 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.

आज नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्गांमध्ये बेघर सोसायटी, शनिवार पेठ, कर्णिक नगर, आदित्य नगर, सन्मती नगर, मजरेवाडी येथील देसाई नगर, सेटलमेंट कॉलनी नंबर 3, प्रताप नगर झोपडपट्टी, दमाणी नगर, एसआरपीएफ कॅम्प, जुळे सोलापुरातील जानकी नगर, होटगी रोड वरील ड्रीम अपार्टमेंट, जुळे सोलापुरातील गुरुदेव दत्त नगर, जुळे सोलापुरातील शिवगंगा नगर, जुळे सोलापुरातील शिवरत्न नगर, गुरुवार पेठ येथील निर्मल हाईटस, मजरेवाडी येथील राघवेंद्र नगर, मोहिते नगर, सर्वसुखी नगर, लक्ष्मी पेठेतील शिवाई नगर, सिध्दजीन सोसायटी, कन्ना चौक, गोविंद श्री मंगल कार्यालयाजवळ, मुरारजी पेठेतील लोकमंगल पार्क, विकास नगर, दक्षिण कसबा, देगाव येथील लक्ष्मी नगर, उमा नगरी येथील व्यक्तींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the city of Solapur 881 reports found 33 new corona