लिपिक झाले अधीक्षक अन्‌ क्रीडाधिकारी ! "प्रभारी'वर चालतोय 11 महत्त्वाच्या खात्यांचा कारभार

तात्या लांडगे
Wednesday, 21 October 2020

उपअभियंत्यांकडेच दिला खात्याचा संर्पूण पदभार
महापालिकेतील 11 विभागांना स्वतंत्र अधिकारी मिळालेला नाही. अब्दुलरशीद मुंढेवाडी हे आवेक्षक असतानाही त्यांच्याकडे मुख्य लेखापरीक्षकाची जबाबादारी आहे. आरोग्य निरीक्षक श्रीराम कुलकर्णी यांच्याकडे अन्न व परवाना विभागाचा पदभार असून उपअभियंता संजय धनशेट्टी यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य अभियंत्याची जबाबदारी आहे. दुसरीकडे उपअभियंता लक्ष्मण चलवादी यांच्याकडे नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालकाचा चार्ज असून सहाय्यक अभियंता असलेल्या सारिका आकुलवार यांच्याकडे भूमी व मालमत्ता विभागाच्या अधीक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांच्याकडे मुख्य लेखापरीक्षकाचा अतिरिक्‍त पदभार दिली आहे. तर नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी म्हणून अतिरिक्‍त काम सोपविले आहे. सहाय्यक उद्यान अधीक्षक अजय चव्हाण यांच्याकडे उद्यान अधीक्षकाचा पदभार दिला आहे.

सोलापूर : जगात अशक्‍य असे काहीच नाही, याची प्रचिती सोलापूर महापालिकेत आली आहे. स्थानिक संस्थाकर विभागातील वरिष्ठ लिपिक विश्‍वनाथ इरकल यांच्याकडे त्या विभागाचा अख्खा पदभारच देऊन टाकला आहे. तर दुसरीकडे क्रीडा विभागातील कनिष्ठ लिपिक नजीर शेख यांच्याकडे क्रीडाधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्या 11 विभागांचा कारभार अशाच प्रकारे सुरू असल्याने कर वसुलीत मोठा फटका महापालिकेला सोसावा लागला आहे.

महापालिकेतील अन्न व परवाना विभाग, मुख्य लेखापरीक्षक, विधान सल्लागार, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सहाय्यक संचालक नगररचना, भूमी व मालमत्ता, मुख्यलेखापाल, नगरसचिव, क्रीडा, उद्यान अधीक्षक आणि स्थानिक संस्था कर या विभागांचा पदभार अन्य विभागांच्या तथा त्याच विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. यातील सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाला दरवर्षी साधारणपणे 11 ते 13 कोटींचे, स्थानिक संस्था कर विभागाला 11 कोटी, भूमी व मालमत्ता विभागाला 43 ते 45 कोटींचे, आरोग्य विभागाला दीड ते अडीच कोटी रुपयांचे आणि उद्यान विभागाला 20 लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्टे दरवर्षी दिले जाते. मात्र, मागील तीन वर्षांत या विभागांनी 40 टक्‍क्‍यांपर्यंतदेखील टार्गेट पूर्ण केलेले नाही. त्यामुळे अशा प्रभारी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याबाबत प्रशासन पेचात सापडले आहे.

उपअभियंत्यांकडेच दिला खात्याचा संर्पूण पदभार
महापालिकेतील 11 विभागांना स्वतंत्र अधिकारी मिळालेला नाही. अब्दुलरशीद मुंढेवाडी हे आवेक्षक असतानाही त्यांच्याकडे मुख्य लेखापरीक्षकाची जबाबादारी आहे. आरोग्य निरीक्षक श्रीराम कुलकर्णी यांच्याकडे अन्न व परवाना विभागाचा पदभार असून उपअभियंता संजय धनशेट्टी यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य अभियंत्याची जबाबदारी आहे. दुसरीकडे उपअभियंता लक्ष्मण चलवादी यांच्याकडे नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालकाचा चार्ज असून सहाय्यक अभियंता असलेल्या सारिका आकुलवार यांच्याकडे भूमी व मालमत्ता विभागाच्या अधीक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांच्याकडे मुख्य लेखापरीक्षकाचा अतिरिक्‍त पदभार दिली आहे. तर नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी म्हणून अतिरिक्‍त काम सोपविले आहे. सहाय्यक उद्यान अधीक्षक अजय चव्हाण यांच्याकडे उद्यान अधीक्षकाचा पदभार दिला आहे.

कर वसुलीचे उद्दिष्टे वाढण्याऐवजी झाले कमी
2017- 18 ते 2020-21 या चार वर्षांत महापालिकेच्या विविध विभागांना कर वसुलीचे उद्दिष्टे देताना दरवर्षी त्यात पाच ते दहा टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित असते. मात्र, महापालिकेने 2017- 18 मध्ये सर्व विभागांना 694 कोटी 34 लाखांच्या वसुलीचे उद्दिष्टे दिले. त्यानंतर 2018- 19 मध्ये 677 कोटी 65 लाखांचे तर 2019- 20 मध्ये 659 कोटी 78 लाखांच्या वसुलीचे उद्दिष्टे दिले. यंदा कोरोनामुळे बजेटच झाले नसल्याने सर्व कारभार जीएसटी व एलबीटी अनुदानावर सुरु आहे. महापालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने कोट्यवधी रुपयांची विकास कामे रखडली असून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठीदेखील पैसे नसल्याची आवस्था महापालिकेची झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clerk becomes Superintendent and Sports Officer! 11 important accounts are in charge