गार भजीने गरम झालं डोकं अन्‌ मग पुढे... 

हुकूम मुलाणी
Wednesday, 4 March 2020

या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने पोलिस पथक तयार करण्यात आले. गावातील सामाजिक शांतता कायम राहावा म्हणून ग्रामस्थांना समवेत बैठक घेतली तरीही परिस्थिती बघून आणखीन बैठक घेऊन गावातील वातावरण भविष्यात चांगले राहील याकडे लक्ष दिले जाईल. 
- दत्तात्रय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील हुलजंती येथे दोन गटात झालेल्या भांडणातून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. गावकऱ्यांनी दमदाटी व गुंडगिरी करून गावातील शांततेला गालबोट लावण्यावर कारवाई करावी, यासाठी कालपासून गाव बंद ठेवले आहे. सध्या गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. 
याबाबत निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून या निवेदनात त्यांनी म्हटले की, जातीचा आधार घेत व्यापाऱ्यांना वारंवार धमकावले जात आहे. वारंवार खंडणी मागितली जात आहे. विचारणा केल्यावर ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे. यावर योग्य कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. महालिंगराया देवस्थानामुळे अधिक चर्चेत आलेल्या हुलजंती गावात दोन दिवसापूर्वी हॉटेलमध्ये गरम भजी का दिली नाही, या कारणावरून एका गटाने हॉटेलमध्ये घुसून हॉटेलमधील खाद्यपदार्थ फेकून नुकसान करण्याचा प्रकार केला. तर दुसऱ्या गटाने मागासवर्गीय वस्तीत जाऊन आम्ही तुम्हाला गावात राहू देणार नाही, असे धमकावत शिविगाळ करण्यात आल्याच्या फिर्यादी दाखल झाल्या. यामध्ये दोन्ही गटाकडून 20 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी राजकारणाशी निगडित आहेत. या घटनेमुळे गावातील सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. या ठिकाणी महालिंगराया देवस्थानच्या दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून सातत्याने भाविकांची वर्दळ सुरू असते. परंतु अशा घटनेमुळे या धार्मिक वातावरणाला गावाला गालबोट लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी कालपासून गाव कडकडीत बंद ठेवले. काल आठवडा बाजार असल्यामुळे या ठिकाणी सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, सलगर खुर्द, पौट माळेवाडी, येळगी येथील लोक खरेदी विक्रीसाठी येत असतात. या बंदचा त्यांनाही फटका सोसावा लागला. सध्या पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

 

या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने पोलिस पथक तयार करण्यात आले. गावातील सामाजिक शांतता कायम राहावा म्हणून ग्रामस्थांना समवेत बैठक घेतली तरीही परिस्थिती बघून आणखीन बैठक घेऊन गावातील वातावरण भविष्यात चांगले राहील याकडे लक्ष दिले जाईल. 
- दत्तात्रय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Closed in Huljanti in Solapur district