'माझे कुटूंब माझी जबाबदारी'नंतरही को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी ! आज 31 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Tuesday, 20 October 2020

ठळक बाबी... 

  • बारा लाखांच्या शहरात आतापर्यंत 88 हजार 407 संशयितांचीच कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले नऊ हजार 306 कोरोना पॉझिटिव्ह 
  • एकूण रुग्णांपैकी 345 पुरुषांचा तर 172 महिलांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • आतापर्यंत शहरातील आठ हजार 165 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

सोलापूर : शहरातील रुग्णांची संख्या एकूण टेस्टच्या तुलनेत 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील केवळ 88 हजार 407 संशयितांचीच कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' मोहीम राबविली जात आहे. तरीही शहरातील को- मॉर्बिड रुग्णांचे मृत्यू थांबलेले नाहीत. आज 62 वर्षांवरील तिघांचा मृत्यू झाला असून 346 टेस्टमध्ये 31 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक बाबी... 

  • बारा लाखांच्या शहरात आतापर्यंत 88 हजार 407 संशयितांचीच कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले नऊ हजार 306 कोरोना पॉझिटिव्ह 
  • एकूण रुग्णांपैकी 345 पुरुषांचा तर 172 महिलांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
  • आतापर्यंत शहरातील आठ हजार 165 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

 

गांधी नगर (अक्‍कलकोट रोड), बुधवार पेठ (सम्राट चौक), सोनी नगर (हुडको), लोटस अपार्टमेंटसमोर (गीता नगर), अण्णा कॉलनी, राजस्व नगर, कोटणीस नगर, गणेश नगर, टेलिग्राम सोसायटी (विजयपूर रोड), प्रल्हाद नगर (सैफूल), बसवेश्‍वर नगर, गांधी नगर झोपडपट्टी, चिदंबर नगर (जुळे सोलापूर), सुनिल नगर, राजीव नगर, म्हाडा कॉलनी (अष्टविनायक नगर), कर्णिक नगर, आसरा हौसिंग सोसायटी (होटगी रोड), धर्मश्री लाईन (मुरारजी पेठ) आणि शुक्रवार पेठेत नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात आज आसरा सोसायटीतील 62 वर्षीय पुरुष, धर्मश्री लाईन येथील 68 वर्षीय पुरुष आणि जुळे सोलापुरातील आशियाना नगरातील 64 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात सद्यस्थितीत 91 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये असून 76 संशयितांना इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Co-morbid patient still all time victim ! Today, 31 were positive and three died