सोलापूर जिल्हा महसूल संघटनेच्या शिबिरात 57 बाटल्या रक्त संकलन 

प्रमोद बोडके
Friday, 19 June 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रक्तदान शिबिर होत नसल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

सोलापूर : सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना व अधिकारी यांच्यावतीने आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात 57 बाटल्या रक्त संकलन झाले आहे. सोलापूर येथील श्री शिवछत्रपती रंगभवन येथे हे शिबिर झाले. यात महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. 

 निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, अनिल कारंडे, तहसीलदार अमोल कुंभार, श्रीकांत पाटील, किरण जमदाडे, बाळासाहेब शिरसाट, विधी अधिकारी वर्धमान वसगडेकर यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील रक्तपेढीचे प्रमुख राजू माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन केले. रक्तदान शिबिराचे आयोजन महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड, अमरनाथ भिंगे, संदीप लटके, लक्ष्मीकांत डोळे, विठ्ठल गुरव, विजय ढावरे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collection of 57 bottles of blood in the camp of Solapur District Revenue Association