esakal | जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त म्हणाले ! ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्रा साधेपणानेच
sakal

बोलून बातमी शोधा

sidheshwar1-20180147380_202011520584.jpg

गर्दीमुळे कोरोना वाढणार नाही याची घेतली जाईल दक्षता
कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने यात्रा काळात भाविकांची मोठी गर्दी होणार नाही, याला प्राधान्य दिले जाईल. तत्पूर्वी, पंढरीच्या श्री विठ्ठलाची कार्तिकी वारी रद्दचा निर्णय झाला. आता ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्त गर्दी होणार नाही, यासंबंधीचा लवकरच निर्णय होईल. महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक यात्रेनिमित्त सोलापुरात दाखल होणे सोलापुकरांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे यात्रा साधेपणानेच साजरी करावी लागेल.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त म्हणाले ! ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्रा साधेपणानेच

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असतानाच पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी वारी रद्द करण्याचा निर्णय झाला. आता सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्राही साधेपणानेच साजरी करण्याच्या निर्णयावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे ठाम आहेत. तत्पूर्वी, महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर त्यावर संयुक्‍तपणे बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर यात्रा काळात नाकाबंदी
कोरोना काळात यावर्षीचे सर्व सण- उत्सव, यात्रा साधेपणानेच साजरे झाले. नागरिकांनी प्रशासनाला खूप सहकार्य केले आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असल्याने सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची यात्रा साधेपणानेच होईल. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्‍त, मंदिर समितीचे पदाधिकारी व पोलिस प्रशासनाची बैठक होईल.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त

कार्तिकी वारी रद्द झाल्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील सुमारे 11 जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आली. वारी रद्द झाल्याने त्यांच्या जिल्ह्यातील भाविक पंढरपुरात येणार नाहीत, यासंबंधीचे उपाय करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. दरम्यान, ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्ताने 15 डिसेंबरनंतर नंदीध्वज सराव सुरु होतो. तर 9- 10 जानेवारीला मानदंडाची पूजा होते. 12 ते 15 जानेवारी या काळात अक्षता सोहळ्यासह अन्य विधी पार पाडले जातात. दरम्यान, 68 लिंगांची दोन दिवस प्रदक्षिणा केली जाते. मिरवणुकीनिमित्त किमान पाच हजारांपर्यंत भाविक नंदीध्वजासोबत असतात. दुसरीकडे राज्य सरकारने करमणुकीच्या कार्यक्रमांनाही सशर्त परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर यात्रेनिमित्त ठोस आराखडा तयार करुन यात्रा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी मंदिर समितीतर्फे करण्यात आली आहे. परंपरेनुसार धार्मिक विधी व्हावेत, भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक केले जाईल. मात्र, यात्रेसंबंधी सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही मंदिर समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यासंबंधी पुढील आठवड्यात मंदिर समितीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त, पोलिस आयुक्‍तांची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन यात्रेसंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविला जाणार आहे. 


गर्दीमुळे कोरोना वाढणार नाही याची घेतली जाईल दक्षता
कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने यात्रा काळात भाविकांची मोठी गर्दी होणार नाही, याला प्राधान्य दिले जाईल. तत्पूर्वी, पंढरीच्या श्री विठ्ठलाची कार्तिकी वारी रद्दचा निर्णय झाला. आता ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्त गर्दी होणार नाही, यासंबंधीचा लवकरच निर्णय होईल. महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक यात्रेनिमित्त सोलापुरात दाखल होणे सोलापुकरांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे यात्रा साधेपणानेच साजरी करावी लागेल.
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी