दिलासादायक; ग्रामीण भागात आज एकही कोरोनाबाधित नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

तालुकानिहाय बाधितांची संख्या 
अक्कलकोट-40, बार्शी-30, करमाळा-1, माढा-7, माळशिरस-5, मंगळवेढा-0, मोहोळ-13, उत्तर सोलापूर-15, पंढरपूर-7, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-94, एकूण-215. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी आजचा कोरोना अहवाल दिलासादायक ठरला आहे. आज आलेल्या अहवालानुसार ग्रामीण भागात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नसल्याने ग्रामीण भागातील लोकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. 

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज एकूण 120 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, हे सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, आज आलेल्या अहवालाने काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही एकही रुग्ण बाधित न आढळल्याने कोरोनाबाधितांची ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 215 एवढीच कायम राहिली आहे. अद्यापही 24 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आजच्या अहवालानुसार मयतांची संख्या 12 एवढीच कायम राहिली आहे. रुग्णालयात अद्यापही 108 जण उपचार घेत आहेत. 95 जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comforting; In rural areas today there is no coronation