बाळ्यातील भिमनगरमध्ये पेव्हर ब्लॉक कामाचा प्रारंभ 

प्रमोद बोडके
Sunday, 11 October 2020

बाळे गावठाण येथील भीमनगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून पेव्हर ब्लॉक घालण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.

सोलापूर : सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील बाळे गावठाण येथील भीमनगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून पेव्हर ब्लॉक घालण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. भाजप नगरसेविका स्वाती आवळे व या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. 

याप्रसंगी माजी नगरसेविका स्मिता भावे, सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलुरे, नागनाथ तांबे, नानाभाऊ शिंदे, रामेश्‍वर झाडे, शंकर मोलकरी, तुकाराम सरवदे, शिवलिंग शिवपुरे, पवन आलुरे, सागर सुरवसे, शिरीष सुरवसे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेविका आवळे म्हणाल्या, या कामासाठी चार लाख रुपये खर्च येणार आहे. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा लाभ यापूर्वी शहराच्या विशिष्ट भागातच होत होता. आमदार विजयकुमार देशमुख यांनी विशेष प्रयत्न करुन शहरातील इतर भागात वसलेल्या दलित वस्त्यांचा विकास व्हावा म्हणून ही योजना आखण्यास शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्यामुळे आज शहराच्या सर्व भागातील दलित वस्त्यांचा विकास होत आहे. या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या दलित बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याचे विशेष प्रयत्न आमदार देशमुख करीत आहेत. शहरातील दलित वस्तींचा चेहरामोहरा बदलून कायापालट होत असल्याचेही नगरसेविका आवळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commencement of Paver Block work in Bhimnagar, Bale