ग्रामस्तरावरील समितीवर ‘ही’ असणार जबाबदारी; सरपंचाचा यात समावेश नाही

Committee formed to prevent corona at village level in Solapur district
Committee formed to prevent corona at village level in Solapur district

सोलापूर : राज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्याची अमंलबाजवणी जिल्हास्तरावर जिल्हाप्रशासनाकडून केली जात आहे. यातूनच गाव पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावर समिती स्थापन केली आहे. त्या समितीवर आता जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सरपंचाचा सामावेश केलेला नाही.
राज्यात कोरोना व्हायरसची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. सध्या बाहेरच्या जिल्ह्यातून व राज्यातून येणाऱ्यांनाही सरकार परवानगी देत आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याबाबत समितीवर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

कोण आहे या समितीमध्ये
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गावपातळीवरील गठीत कृती समितीने पार पाडायाच्या जबाबदारीबाबत १९ मे रोजी आदेश काढला आहे. या समितीचे पदसिध्द अध्यक्ष संबंधीत गावाचे तलाठी असणार आहेत. तर ग्रामसेवक सचिव असणार आहेत. याशिवाय विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, महिला बचत गट ग्राम संघ अध्यक्ष, महिला बचत गटाचे सचिव, पोलिस पाटील हे सदस्य आहेत. 

समितीची ही असणार जबाबदारी...
सध्या जिल्ह्यामध्ये परराज्यातून व पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्‍यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गावा पातळीवर समिती गाठीत केली आहे. या समितीवीर देण्यात आलेली जबाबदारी...

  • परजिल्ह्यातून व परराज्यातून गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांची माहिती ग्रामपंचायस्तरावर विहीत नमुन्यात तयार करुन संबंधित गटविकास अधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना सादर करणे.
  • बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तीची तपासणी खासगी डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून करुन घेणे. तपासणीत कोरोना सदृश लक्षणे नसतील तर त्याला होम क्वारंटाइन करावे. लक्षणे आढळली तर आयसोलेशन क्वारंटाइनसाठी प्राथमिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी देण्यात यावे.
  • होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना स्वतंत्र घरात ठेवणे. याशिवाय योग्य ती खबरदारी घ्यावी.
  • एखाद्या व्यक्तीला स्वतंत्र घर नसेल किंवा काही व्यवस्था न झाल्यास गावपातळीवरील आयसोलेशन क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. 
  • होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीला किराणा, भाजीपाला, औषधे या जिवनावश्‍यक वस्तू घरपोच कराव्यात.

अन्यथा गुन्हा दाखल करावा
होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीने लहान मुले, गर्भवती, ५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती, बीपी, टीबी, डायबेटीज असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. बाहेर फिरणे, मास्क न घालणे, गर्दी करणे आदी गैरकृत्य करणाऱ्यावर प्रथम १००० रुपये व दुसऱ्यावेळी चुक केल्यास २००० रुपये दंड आकरण्यात येणार आहे. याशिवाय समितीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com