खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी केला संविधानद्रोह : शिवानंद हैबतपुरे

Jaysidheshwar & Haibatpure
Jaysidheshwar & Haibatpure
Updated on

सोलापूर : लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केलेला गुन्हा हा राजकारणाचा भाग नसून, ती संविधानाची व संसदीय कार्यपद्धतीची प्रतारणा आहे. खोटे बोलून व समाजाची दिशाभूल करून ही व्यक्ती खासदार बनली आहे. हा संविधानद्रोह तर आहेच पण लिंगायत धर्माचा अपमानही आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते, अखिल भारतीय बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद हैबतपुरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली आहे.

सगळा सावळा गोंधळ लोकांची दिशाभूल करणारा
ज्या समाजाच्या जिवावर जयसिद्धेश्वर महास्वामी खासदार बनले, त्या समाजाच्या स्वतंत्र धर्म मान्यतेच्या मुद्द्यावर जयसिद्धेश्वर महास्वामी प्रतिकूल आहेत. लिंगायत आंदोलनाच्या व लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवन्ना यांच्या शिकवणुकीच्या विरोधात त्यांचे हे वागणे आहे. जयसिद्धेश्‍वर यांच्या शालेय सर्टिफिकेटवर हिंदू लिंगायत आहे, त्यांचे वागणे वैदिक परंपरेचे आहे आणि बेडा जंगम या अनुसूचित जातीचे आहेत म्हणून ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. अर्थात हा सगळा सावळा गोंधळ लोकांची दिशाभूल करणारा आहे.

खासदार महास्वामींनी जाहीर माफी मागावी
सोलापूरच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी खूप मोठ्या स्तरावर प्रस्थापितांनी षड्‌यंत्र रचले होते. जयसिद्धेश्वर महास्वामी हे त्याच षड्‌यंत्राचा भाग आहेत. सोलापूरची लोकसभा निवडणूक ही जातीयवादाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्यात आली आहे. परिणामी आंबेडकरांसारख्या बुद्धिवान नेत्याला संसदेपासून वंचित राहावे लागले. लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म असून यासंदर्भात झालेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनात जयसिद्धेश्वर महास्वामी कोठेही दिसले नाहीत, पण लिंगायतांच्या नावाने स्वतःची झोळी मात्र भरून घेतली जात आहे. बसवविरोधी आणि लिंगायत विरोधी जयसिद्धेश्वर महास्वामींनी सर्वांची जाहीर माफी मागावी आणि मठात बसावे, असे मत श्री. हैबतपुरे यांनी मांडले आहे. या पत्रकार परिषदेस युवानेते विक्रांत गायकवाड, अविनाश इंगळे उपस्थित होते.

जयसिद्धेश्वर महास्वामी यांची कागदपत्रे ही बोगस आहेत, याची माहिती त्यांना स्वतःला होती. असे असूनही त्यांनी ही निवडणूक लढवली. आज कागदपत्रे दाखवण्याची वेळ आली तर त्यांनी आपली कागदपत्रे प्रवासात हरवली आहेत असे सांगितले आहे. हे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा अशी स्थिती आहे.
- शिवानंद हैबतपुरे,
प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय बसव परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Fear Among Vendors as Authorities Tighten Noose on Illegal Mawa Sales
Ayurvedic Tea Business Flourishes, Providing Livelihood to Dozens Across Maharashtra
Blood Relations Tarnished: Nephew Arrested After Uncle Dies During Treatment
Despite Losing His Father Early, Shubham Fights Odds to Become a Lawyer
Marathi News Esakal
www.esakal.com