सध्याचे सरकार महाविकास आघाडीचे की, राष्ट्रवादीचे? ‘या’ जिल्ह्यात शिवसेनेची तक्रार

Complaint of Shiv Sena leader in Solapur district to Home Minister Anil Deshmukh
Complaint of Shiv Sena leader in Solapur district to Home Minister Anil Deshmukh

मोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे महाविकास आघाडीचे आहे की राष्ट्रवादीचे, असा संभ्रम झाला आहे. मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने हे मित्र पक्ष या नात्याने शिवसेनेला कुठेही विश्वासात घेत नाहीत, विकास कामावेळी मित्रपक्षांना बोलविण्याची जबाबदारी ही स्थानिक आमदाराची आहे. मात्र त्याची अंमलबजावणी जाणून- बुजून व हेतु पुरस्करपणे केली जात नाही, ही परिस्थिती अशीच राहिली तर नाईलाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती घालून त्यांच्याकडे दाद मागावी लागेल, अशी तक्रार मोहोळचे शिवसेनेचे जेष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.
राज्याचे गृहमंत्री देशमुख हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोलापूरला जाताना मंत्री देशमुख क्षीरसागर यांच्याकडे थांबले होते. त्यावेळी क्षीरसागर यांनी वस्तुस्थिती त्यांना सांगितली. यावेळी मोहोळ तालुक्यातील अनेक विकास कामे अद्यापही झाली नाहीत. तालुका विकासापासून आजही कोसा दूर आहे. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा. रुग्णांना सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात खाजगी डॉक्टर सर्व सामान्याला सेवा देत नाहीत, रुग्णांची हेळसांड करतात. त्यांना समज द्यावी, सध्या पेरणीची लगबग सुरू आहे, बाजारात अनेक ठिकाणी बोगस खते व बीबियाणे आहेत. त्याचा शोध घ्यावा व संबंधितांवर कारवाई करावी, अनेक गावातील रस्ते, पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करावीत, कामती येथील रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, जेणे करून परिसरातील गावांची सोय होईल, अशी उपाययोजना करावी अशा मागण्यांचे निवेदन क्षीरसागर यांनी गृहमंत्री देशमुख यांना दिले. यावेळी शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर, प्रशांत गाढवे, सागर लेंगरे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com