या परीक्षेतील यशाबद्दल उत्तर सोलापूरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

सोलापूर ः विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम केल्यास त्यांना निश्‍चितच यश मिळते असे मत जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी व्यक्त केले. नवोदय विद्यालयासाठी पात्र झालेल्या उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 16 विद्यार्थ्यांचा सत्कार आज वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे करण्यात आला. त्यावेळी श्री. साठे बोलत होते. 

उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर आशा वर्कर्स यांना वडाळा ग्रामपंचायतीच्यावतीने एक हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला. कोरोनाच्या काळात आशा वर्कर्स यांनी केलेले काम चांगले असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. 

हा सत्कार श्री. साठे, उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. काशीद यांनी भविष्यात या विद्यार्थ्यांनी तालुक्‍याचे नाव पुन्हा उज्वल करण्याचे आवाहन केले. यावेळी शिक्षकांचाही सत्कार केला. ळी सरपंच छाया कोळेकर, उपसरपंच जितेंद्र साठे, रूपाली गाडे, संपत गाडे, मनोज साठे, प्रभाकर गायकवाड, मिलिंद साठे, लक्ष्मण कांबळे, बापू साठे, बाळू सुतार, मधुकर गायकवाड, बळीराम मोहिते, पांडू नागणे, विकास गाडे, प्रकाश लामकाने, ग्राम विकास अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते. प्रा. ज्ञानेश्‍वर सिरसट यांनी सूत्रसंचालन केले. नागनाथ साठे यांनी आभार मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congratulations to the students of North Solapur for their success in this examination