जिल्ह्यातील दीड लाख पालकांनी दिले संमतीपत्र ! माळशिरस, अक्‍कलकोट, मंगळवेढ्यातील सर्वच शाळा सुरु

3School_20fb.jpg
3School_20fb.jpg
Updated on

सोलापूर : कोरोनामुळे 'शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरु'याअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने राबविला. मात्र, मोबाईलअभावी व नेटवर्कचा अडथळा असल्याने बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून दूरच राहिले होते. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय झाला. 23 नोव्हेंबरपासून आतापर्यंत शहर- जिल्ह्यातील एक हजार 87 पैकी तब्बल एक हजार 20 शाळा सुरु झाल्या आहेत.

नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्‍के शाळा सुरु होतील
कोरोना काळातील सर्व प्रकारच्या उपाययोजना व नियमांचे पालन करीत शहर- जिल्ह्यातील एक हजार 20 शाळा सुरु झाल्या आहेत. बुधवारी (ता. 25) अडीच लाखांपैकी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. नोव्हेंबरअखेरपर्यंत 100 टक्‍के शाळा सुरु होतील, असा विश्‍वास आहे.
- अशोक भांजे, विस्ताराधिकारी, माध्यमिक शिक्षण, सोलापूर

सोलापूर शहर- जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या एक हजार 87 शाळा आहेत. या शाळांमध्ये दोन लाख 51 हजार 154 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेत मुलाला पाठविण्यासाठी पालकांची संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मागील तीन दिवसांत एक लाख 48 हजार पालकांनी संमतीपत्र दिले असून उर्वरित पालकांनी अद्याप तोंडावर बोट ठेवले आहे. दरम्यान, सोलापूर शहरातील 22, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी पाच, मोहोळ तालुक्‍यातील एक पंढरपूर तालुक्‍यातील 25, सांगोल्यातील तीन, करमाळा, माढा व बार्शीतील प्रत्येकी दोन शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. शहर- जिल्ह्यातील 212 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 19 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली. दरम्यान, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची खूप गरज असल्याने नियमांचे पालन करुन मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून केले जात आहे.


तालुकानिहाय सुरु झालेल्या शाळा 
सोलापूर शहर (132), उत्तर सोलापूर (74), दक्षिण सोलापूर (67), अक्‍कलकोट (77), मोहोळ (65), मंगळवेढा (55), पंढरपूर (97), सांगोला (84), माळशिरस (95), करमाळा (55), माढा (98) आणि बार्शी (121) अशा शाळा सुरु झाल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

boramani murder case
solapur city police
Ujani Dam Nearly Full at 99.78 Percent Water Discharge Into Bhima River Resumes at 1600 Cusecs for Safety
Solapur Marital Harassment Case Woman Allegedly Pressured Over Childbirth and Rs 40 Lakh Demand Seven Booked
Marathi News Esakal
www.esakal.com