अरेव्वाः कोरोना व सारीच्या आजारावर एैंशी वर्षीय महिला व त्यांच्या मुलाने केली मात 

valuj 2.jpg
valuj 2.jpg
Updated on

वाळूज(सोलापूर)ः येथील सारी व कोरोना बाधीत एैंशी वर्षीय महिला व त्यांचा 47 वर्षीय मुलगा या माय-लेकराने एकाच वेळी दोन आजारावर मात केली आहे. त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले. दोन आजाराच्या तावडीतून सुटका झालेल्या या माय लेकराचे कुटूंबीयांकडून त्यांचे औक्षण, फुलांची उधळण करून आणि फुलांच्या पायघड्यावर स्वागत करण्यात आले. 

19 जून रोजी वाळूजमध्ये एका ऐंशी वर्ष वयाच्या महिलेस कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. ही वृध्द महिला सोलापूर येथील खासगी दवाखान्यात मणक्‍याच्या उपचारासाठी गेलेली होती. तेथे या महिलेस कोरोना रोगाची बाधा झाल्याचा तपासणी अहवाल सुरुवातीला आला होता. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबातील तेरा व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते.  या प्रकारामुळे अख्खा गाव हादरून गेला. त्यानंतर या महिलेची सारी आजाराबाबतीच तपासणी केली तेव्हा सारी अहवाल पॉझिटिव्ह आढळला. तातडीने या वृध्द महिलेवर उपचार सूरू झाले. 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या महिलेच्या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या 13 सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये या महिलेच्या 47 वर्षीय धाकट्या मुलास कोरोना लागण झाल्याचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यानंतर सदरील वृध्द महिला व त्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलावरही उपचार सूरू होते. महिलेवर उपचार पूर्ण झाल्यानंतर त्या सारी आजारातून बऱ्या झाल्या. तसेच त्यांच्या मुलावर कोरोना आजाराचे उपचार झाले. चार दिवसानंतर या मुलांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. दोघेही रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयाने तपासणी करून त्यांना वाळूजला घरी पाठवण्यास परवानगी दिली. गुरूवारी (ता.2) रोजी रात्री हे मायलेक गावात दाखल झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे फुले उधळून आणि औक्षण करून स्वागत केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com