
सोलापूर : शहरातील कोरोना आता झोपडपट्ट्यातून अपार्टमेंट, हौसिंग सोसायट्यांमध्ये शिरला आहे. आज शहरातील 20 अपार्टमेंट आणि हौसिंग सोसायट्यांमध्ये रूग्ण आढळले आहेत. शहरात आज एकूण 280 रुग्ण आढळले असून त्यातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात 539 रुग्ण आढळले असून त्यातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे.
'या' अपार्टमेंट, हौसिंग सोसायट्यांत रुग्ण
युनायटेड रेसिडेन्सी (रेल्वे लाईन), आसरा सोसायटी, केदारनाथ रेसिडेन्सी (मुरारजी पेठ), सिध्दार्थ हौसिंग सोसायटी (सम्राट चौक), द्वारका रेसिडेन्सी (बुधवार पेठ), लक्ष्मी अपार्टमेंट, दिपाजंली अपार्टमेंट (होटगी रोड), विजय हौसिंग सोसायटी, ओंकार अपार्टमेंट, उध्दार हौसिंग सोसायटी, चक्रवर्ती हौसिंग सोसायटी, गुरूमलकृपा अपार्टमेंट, अक्षत अपार्टमेंट (रंगभवनजवळ), खमितकर अपार्टमेंट, करूणा सोसायटी (अंत्रोळकीर नगर), मेडिकल सोसायटी, नम्रता हौसिंग सोसायटी, विष्णूधारा अपार्टमेंट, तुळशी विहार अपार्टमेंट आणि आंबेडकर हौसिंग सोसायटी याठिकाणी आज रुग्ण सापडले आहेत.
शहरातील रूग्णसंख्या आता 18 हजार 296 इतकी झाली असून त्यातील 782 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी 14 हजार 299 कोरोनावर मात केली असून तीन हजार 215 रुग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील 49 हजार 577 व्यक्तींना कोरोना झाला असून 44 हजार 12 रुग्णांनी कोरोनावर केली आहे. तर ग्रामीण भागातील एक हजार 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार हजार 294 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. अक्कलकोट तालुक्यात 15, बार्शीत 95, करमाळ्यातील 56, माढ्यातील 60, माळशिरसमध्ये 96, मोहोळ तालुक्यातील 30, उत्तर सोलापूर तालुक्यातील 15, पंढरपूर तालुक्यातील 110, सांगोल्यात 15 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात सहा रूग्ण आढळले आहेत.
ठळक बाबी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.