सोलापुरात नगरसेवकाला कोरोना

सोलापुरात नगरसेवकाला कोरोना
Updated on


सोलापूर - सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेन दिवस वाढतच चालली आहे. एका नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे
सोमवारी स्पष्ट झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या नगरसेवकाने पंधरा दिवसांपूर्वी प्रभागातील गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप केले होते. रविवारी मध्यरात्री उशीरा त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सोमवारी दुपारी स्पष्ट झाले. या नगरसेवकाच्या कुटुंबियासही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 457 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 139 आहेत. पुणे विभागात कोरोनाबाधीत एकुण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.


पुणे विभागात 1 हजार 457 बाधित रुग्ण असून 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 319 बाधीत रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात  65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत.
     आजपर्यत विभागामध्ये एकुण  15 हजार 811 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 हजार 935 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 877 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 13 हजार 428 नमून्यांचा  अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 457 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Vidhan Parishad election results BJP victory
Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live
Shocking Murder in Mohol: Woman and Two Sons Accused in Uncle’s Killing
tet exam
Marathi News Esakal
www.esakal.com