esakal | डॉक्‍टरांचा सल्ला न ऐकणाऱ्या 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने घेतला बळी ! आज 122 रुग्ण गेले घरी
sakal

बोलून बातमी शोधा

1corona_20test_48.jpg

मृत व्यक्‍तीने ऐकला नाही डॉक्‍टरांचा सल्ला 
उमा नगरी येथील मुरारजी पेठेत राहणाऱ्या 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी, त्यांना मागील सात दिवसांपासून अशक्‍तपणा होता. त्यांनी खासगी डॉक्‍टरांचा सल्ला घेतला होता. त्यांना डॉक्‍टरांनी कोविड- 19 ची तपासणी करण्यास सांगूनही ते घरीच राहीले. 23 ऑक्‍टोबरला अचानक बेशुध्द पडल्यानंतर त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.

डॉक्‍टरांचा सल्ला न ऐकणाऱ्या 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने घेतला बळी ! आज 122 रुग्ण गेले घरी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग आता आटोक्‍यात येऊ लागला असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर वाढला आहे. आज शहरातील 434 संशयितांपैकी 25 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यात सौम्य लक्षणे असलेल्या तथा लक्षणे नसलेल्यांचाच सर्वाधिक समावेश असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आता शहरातील अवघ्या 437 रुग्णांवर उपचार सुरु असून उर्वरित सर्व रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 90 हजार 219 संशयितांची झाली आतापर्यंत कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात सापडले नऊ हजार 419 कोरोना पॉझिटिव्ह
  • आज 122 रुग्णांना सोडले घरी तर 25 नव्या रुग्णांची पडली भर
  • आतापर्यंत आठ हजार 456 रुग्णांनी केली कोरोनावर मात; 526 रुग्णांचा मृत्यू
  • आता शहरात उरले अवघे 437 रुग्ण; मुरारजी पेठेतील 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने घेतला बळी

शहरात आज लक्ष्मी नगर (बाळे), विकास नगर, विवेकानंद नगर (सैफूल), बसवेश्‍वर नगर (होटगी रोड), कुमठे, आशिर्वाद नगर (मजरेवाडी), सायली हाईट्‌स (वसंत विहार), अभिषेक पार्क (लक्ष्मी पेठ), अवंती नगर, टिळक नगर, उत्कर्ष नगर, लोकमान्य नगर, परिमल सोसायटी, होमकर नगर (भवानी पेठ), आजोबा गणपतीजवळ, साईबाबा चौक, प्रेम नगर (जुळे सोलापूर), अभिमानश्री नगर (मुरारजी पेठ) आणि सोलापूर जेलजवळ नवे रुग्ण सापडले आहेत. शहरातील रुग्णांच्या संपर्कातील 88 संशयित होम क्‍वारंटाईन असून अवघे 65 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. 

go to top