esakal | ब्रेकिंग ! नववी ते बारावीच्या शिक्षकांची कोरोना ड्यूटी रद्द; 21 नोव्हेंबरपासून को-मॉर्बिडचा सर्व्हे
sakal

बोलून बातमी शोधा

1Teachers_20on_20Corona_20Duty.jpg

सुट्टीतील दहा दिवसांची करावी लागेल ज्यादा ड्यूटी
एकाच शिक्षकाला आतापर्यंत एक ते तीनवेळा सर्व्हेची ड्यूटी करावी लागली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असल्याने डिसेंबरपासून शहरात तिसरा सर्व्हे सुरु होणार आहे. 'कुटूंब माझी जबाबदारी'अंतर्गत को- मॉर्बिड रुग्णांवर सर्व्हेच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. नववी ते बारावीच्या वर्गाला शिकविणारे शिक्षक वगळून उर्वरित शिक्षकांना दिवाळीनिमित्त दहा दिवसांची सुट्टी दिल्यानंतर तेवढेच दिवस अगाऊ ड्यूटी शिक्षकांना करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधितांना कार्यमुक्‍त केले जाईल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी सांगितले. शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे शहरातील मृत्यूचे प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मोठी मदत झाल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

ब्रेकिंग ! नववी ते बारावीच्या शिक्षकांची कोरोना ड्यूटी रद्द; 21 नोव्हेंबरपासून को-मॉर्बिडचा सर्व्हे

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारच्या निर्णयानुसार 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. मुलांना एक दिवसाआड दररोज चार तास शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील को- मॉर्बिड सर्व्हेसाठी असलेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना कोरोना ड्यूटीतून मुक्‍त केले जाणार आहे.

सुट्टीतील दहा दिवसांची करावी लागेल ज्यादा ड्यूटी
एकाच शिक्षकाला आतापर्यंत एक ते तीनवेळा सर्व्हेची ड्यूटी करावी लागली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असल्याने डिसेंबरपासून शहरात तिसरा सर्व्हे सुरु होणार आहे. 'कुटूंब माझी जबाबदारी'अंतर्गत को- मॉर्बिड रुग्णांवर सर्व्हेच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. नववी ते बारावीच्या वर्गाला शिकविणारे शिक्षक वगळून उर्वरित शिक्षकांना दिवाळीनिमित्त दहा दिवसांची सुट्टी दिल्यानंतर तेवढेच दिवस अगाऊ ड्यूटी शिक्षकांना करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधितांना कार्यमुक्‍त केले जाईल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी सांगितले. शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे शहरातील मृत्यूचे प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मोठी मदत झाल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

एप्रिलपासून शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर हद्दीतील शिक्षकांची मदत घेतली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिक्षकांची सेवा कोरोना सर्व्हेसाठी वर्ग करण्याचा निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतला. आता शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने आणि सलग साडेसात महिने कोरोनाचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना दिवाळीनिमित्त दहा दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय झाला. मात्र, आता 21 नोव्हेंबरपासून एक हजार 180 शिक्षकांना पुन्हा शहरात घरोघरी सर्व्हेचे काम करावे लागणार आहे. तत्पूर्वी, 30 दिवसांची ड्यूटी पूर्ण केलेल्या शिक्षकांना 25 नोव्हेंबरपर्यंत कार्यमुक्‍त केले जाणार आहे. त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु झाले असून दुसरीकडे नववी ते बारावीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांचीही माहिती मुख्याध्यापकांच्या माध्यमातून संकलित केली जात आहे. त्यांना कोरोना ड्यूटीतून वगळले जाणार असून त्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी शाळानिहाय शिक्षकांची यादी महापालिकेला देतील. त्या पत्रानुसार संबंधितांची ड्यूटी रद्द केली जाईल, असे महापालिकेचे प्रशासनाधिकारी कादर शेख म्हणाले.