अबब..! राज्यातील 'या' 12 शहरांमध्ये वाढतोय कोरोनाचा विळखा; 39 दिवसांतच सोलापूर राज्याच्या टॉप टेन यादीत

तात्या लांडगे
Friday, 22 May 2020

ठळक बाबी...

 • कोरोना संशयितांच्या टेस्टसाठी 144 कोटींचा खर्च (तीन लाख 19 हजार 710 व्यक्तींच्या टेस्ट)
 • मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, वसई-विरार, मालेगाव, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, जळगाव, अकोला व नागपूर या 12 शहरांत मागील 21 दिवसांत वाढले तब्बल 27 हजार 578 रुग्ण
 • आतपर्यंत राज्यातील 11 हजार 726 रुग्ण झाले बरे; चार लाख 37 हजार 304 जणांच्या हातावर होम क़्वारंटाईनचे शिक्के
 • राज्यात सध्या एक हजार 949 प्रतिबंधीत परिसर; 26 हजार 865 व्यक्ती संस्थात्मक क़्वारंटाईन
 • राज्यात 21 दिवसांत वाढले एकूण 30 हजार 136 रुग्ण; तर 969 जणांचा झाला मृत्यू 

सोलापूर :  देशाच्या आर्थिक राजधानीचा विळखा दिवसेंदिवस वाढतच असून 1 ते 21 मे या कालावधीत मुंबईत तब्बल 17 हजार 688 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मागील 21 दिवसात राज्यात 30 हजार 136 रुग्ण वाढले असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, वसई-विरार, मालेगाव, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, जळगाव (287), अकोला व नागपूर (298) या 11 शहरांतच तब्बल 27 हजार 578 रुग्ण सापडले आहेत. या शहरांमध्ये रुग्ण वाढीचा वेग पाहता प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आहे.

राज्याच्या अहवालानुसार 1 मेच्या तुलनेत 21 मेपर्यंत मुंबई महापालिका परिसरात तब्बल 17 हजार 688 रुग्ण आढळले असून सध्या मुंबई महापालिका परिसरातील रुग्णांची संख्या 25 हजार 500 वर पोहोचली आहे. दुसरीकडे ठाणे महापालिका परिसरात सध्या दोन हजार 86 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून मागील 21 दिवसात या परिसरात एक हजार 597 नवे रुग्ण सापडले आहेत. तत्पूर्वी, 20 ते 30 हजारांपर्यंत कोरोना थांबेल, अशी आशा असतानाही काही दिवसांच रुग्ण संख्या 40 हजारांहून अधिक झाली आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आल्याने परस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची खबरदारी म्हणून जिल्हा व महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, या शहरांमध्ये विशेषत: ज्या भागात रुग्ण सापडले आहेत त्याठिकाणी प्रशासनच्या निर्णयाचा काहीच फरक पडत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढू लागली असून पावसाळाही तोंडावर असताना सरकारने लॉकडाउन शिथिल करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

21 दिवसांतील रुग्णांची वाढ...
(राज्याच्या अहवालानुसार कंसात एकूण रुग्ण)

टॉप टेन शहरे....

 • मुंबई महापालिका : 17,688 (25,500)
 • पुणे : 3,218 (4,462)
 • ठाणे महापालिका : 1,597 (2,086)
 • नवी मुंबई मनपा : 1,475 (1,668)
 • औरंगाबाद : 965 (1,126)
 • मालेगाव : 509 (710)
 • कल्याण-डोंबिवली : 462 (641)
 • सोलापूर : 414 (522)
 • वसई-विरार :  360 (425)
 • अकोला : 305 (344)

अन्य शहरांमधील आतपर्यंतचे एकूण रुग्ण....
नागपूर : 436, जळगाव : 287, गडचिरोली : 7, चंद्रपूर : 15, गोंदिया : 3, भंडारा : 9, वर्धा : 3, वाशिम : 8, बुलढाणा : 38, यवतमाळ : 111, अमरावती : 140, नांदेड : 92, बीड : 13, उस्मानाबाद : 19, लातूर : 54, परभणी : 18, जालना : 43, हिंगोली : 110,  रत्नागिरी : 123, सिंधुदुर्ग : 10, सांगली-कुपवाड-मिरज मनपा : 9, सांगली : 54, कोल्हापूर मनपा : 161, सातारा : 184, पिंपरी-चिंचवड : 203, नंदूरबार : 26, धुळे : 95, नगर : 66, नाशिक : 197, पनवेल मनपा : 271, रायगड : 285, पालघर : 102, भिवंडी-निजामपूर मनपा : 80, उल्हासनगर मनपा : 131.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is growing in 12 of these cities in the state In just 39 days Solapur is in the top ten list of the state