कोरोना पुन्हा वाढतोय ! शहर-जिल्ह्यात 112 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

1Corona_20akola_2001_1.jpg
1Corona_20akola_2001_1.jpg

सोलापूर : ग्रामीण भागात अक्‍कलकोट, सांगोला वगळता उर्वरित नऊ तालुक्‍यांमध्ये आज 63 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) आणि बिटले (ता. मोहोळ) येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरात 665 संशयितांमध्ये 49 जण पॉझिटिव्ह असून एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच मृत्यूही वाढू लागल्याची चिंता आहे.

ठळक बाबी...

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 81 हजार 120 संशयितांमध्ये 12 हजार 659 जण पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी 665 जणांचा कोरोनाने घेतला बळी; 496 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • गवळी वस्ती (आकाशवाणी केंद्राजवळ) येथील 66 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे झाला मृत्यू
  • आज 826 संशयितांमध्ये 49 जण पॉझिटिव्ह; 28 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश
  • ग्रामीणमधील अक्‍कलकोट व सांगोल्यात आज एकही रुग्ण आढळला नाही
  • बार्शी 19, करमाळा 13, माढा पाच, माळशिरस नऊ, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापुरात आढळला प्रत्येकी एक रुग्ण
  • पंढरपूर तालुक्‍यात 11 तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात आढळले तीन रुग्ण; ग्रामीणमधील 580 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • ग्रामीणमधील रुग्णसंख्या झाली 40 हजार 976 तर मृतांची संख्या एक हजार 191

शहरात शनि विहार (आरटीओ कार्यालयाजवळ), बालाजी हौसिंग सोसायटी, हुच्चेश्‍वर मठाजवळ (कुमठा नाका), सुंदरम नगर, सिंधू विहार, पापराम नगर, राजस्व नगर (विजयपूर रोड), वसंत विहार, अवंती नगर (पुना नाका), भवानी पेठ, मुरारजी पेठ, जी. एम. चौक (बुधवार पेठ), शाहीर वस्ती, जोडभावी पेठ, पद्मजा पार्कजवळ, शिवगंगा नगर, दत्त नगर (जुळे सोलापूर), रेल्वे लाईन्स, आकाशवाणी केंद्राजवळ, सेटलमेंट फ्रि कॉलनी, उत्तर कसबा, शुक्रवार पेठ, जुना पुना नाका (मुरारजी पेठ), लक्ष्मी मंदिराजवळ (बापूजी नगर), चाटी गल्ली, दक्षिण कसबा, गुलमोहर अपार्टमेंट (वसंत विहार), बागेवाडी हॉस्पिटलजवळ, अवंती नगर (शरदचंद्र पवार शाळेजवळ), कामगार वस्ती, निवारा नगर (एमआयडीसी रोड), अभिषेक पार्क (लक्ष्मी पेठ), काळजापूर मंदिराजवळ (डफरीन चौक), राहूल अपार्टमेंट (विकास नगर), अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), स्वागत नगर (वज्रेश्‍वर नगर), व्हीएमजीएमसी बॉईज हॉस्टेल आणि भूषण नगर याठिकाणी आज नवे रुग्ण आढळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com