esakal | आयुक्‍तसाहेब जरा लक्ष द्या ! कोरोना वाढतोय, तरीही महापालिकेच्या नियंत्रण कक्षात कोणीच नाही

बोलून बातमी शोधा

3solapur_news_mahanagarpalika_696x364_1 (1).jpg

ठळक बाबी... 

  • महापालिकेने शहरातील कोरोनासंबंधी अडचणी सोडविण्यासाठी स्थापन केला कोव्हिड नियंत्रण कक्ष 
  • 0217-2740341 हा आहे नियंत्रण कक्षाचा क्रमांक; कितीही वेळा कॉल करा कोणताच प्रतिसाद नाही 
  • महापालिका आयुक्‍तांनी काही दिवसांपूवी आदेश काढून प्रत्येकांवर स्वतंत्र जबाबदारी सोपविली; कार्यवाही नाहीच 
  • तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती; एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नियंत्रण कक्ष बंद असल्याचे अधिकाऱ्यांचे उत्तर 
  • नगरसेवकांच्या आक्रमतेनंतर वित्त व लेखा अधिकारी शिरीष धनवे म्हणाले, उद्या दोन कर्मचाऱ्यांची केली जाईल नेमणूक 
आयुक्‍तसाहेब जरा लक्ष द्या ! कोरोना वाढतोय, तरीही महापालिकेच्या नियंत्रण कक्षात कोणीच नाही
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रूग्णांना बेड नसल्याबद्दल नातेवाईकांच्या अडचणी, कोरोना रूग्णांसाठीचे कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल, लसीकरणाची माहिती मिळावी म्हणून महापालिकेत कोव्हिड नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी तसे स्वतंत्र आदेश काढून उपायुक्‍त, सहायक आयुक्‍तांवर त्याची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, या नियंत्रण कक्षात कॉल लागतो, पण प्रतिसादच मिळत नसल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. 

ठळक बाबी... 

  • महापालिकेने शहरातील कोरोनासंबंधी अडचणी सोडविण्यासाठी स्थापन केला कोव्हिड नियंत्रण कक्ष 
  • 0217-2740341 हा आहे नियंत्रण कक्षाचा क्रमांक; कितीही वेळा कॉल करा कोणताच प्रतिसाद नाही 
  • महापालिका आयुक्‍तांनी काही दिवसांपूवी आदेश काढून प्रत्येकांवर स्वतंत्र जबाबदारी सोपविली; कार्यवाही नाहीच 
  • तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती; एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नियंत्रण कक्ष बंद असल्याचे अधिकाऱ्यांचे उत्तर 
  • नगरसेवकांच्या आक्रमतेनंतर वित्त व लेखा अधिकारी शिरीष धनवे म्हणाले, उद्या दोन कर्मचाऱ्यांची केली जाईल नेमणूक 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात दररोज सरासरी तीनशेहून अधिक रूग्ण आढळत आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे शहरात दररोज सरासरी दहा मृत्यू होऊ लागले आहेत. अशा परिस्थिती लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. महापालिका आयुक्‍तांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आज (रविवारी) अनेकांना लसीकरण केंद्रांवरून परत जावे लागले. काही केंद्रांवर शनिवारी (ता. 10) अनेकांना टोकन देऊन पाठविण्यात आले होते. त्यांना लस टोचण्यात आली. शहरातील नागरिकांना लस कोणत्या केंद्रांवर मिळते, कोव्हिड केअर सेंटरवरील रूग्णांच्या अडचणी, इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन सेंटरवरील अडचणी प्रशासनाला थेट सांगता याव्यात आणि त्यातून मार्ग काढणे सोयीस्कर होईल म्हणून नियंत्रण कक्ष गरजेचा आहे. मात्र, महापालिकेचा नियंत्रण कक्ष नावालाच असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक नारायण बनसोडे, राजकुमार हंचाटे यांनी सोशल मिडियातून नाराजी व्यक्‍त केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी उद्यापासून (सोमवारी) दोन कर्मचारी नियुक्‍त केले जातील, असे उत्तर त्यांना दिले.