दिलासादायक....! सोलापुरात गुरुवारी आढळले ५ नवे कोरोना बाधित, एकूण पॅाझिटीव्ह १७५४

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 18 जून 2020

गेल्या मंगळवारी फक्त 18 बाधित आढळल्याने दिलासा मिळाला होता, मात्र बुधवारी 77 जणांना लागण झाल्याने सोलापूर शहरवासियांना जोरदार धक्का बसला होता. आता गुरुवारी फक्त पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. 

सोलापूर : महापालिका हद्दीत गुरुवारी तब्बल पाच जणांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत कोरोनाबाधितांची  संख्या १७५४ वर पोचली आहे. तर आज १९ जण बरे होऊन परत गेले आहेत.  दोन जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे शहरातील एकाही रुग्णाचा अहवाल आता प्रलंबित राहिलेला नाही. 

शहरातील सत्तरफूट रस्ता, कुमठा नाका, न्यू पाच्छा पेठ, नवनाथ नगर आणि शासकीय रुग्णालयातील निवासस्थान या परिरिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत. 


सोलापूर शहरात आता १७५४ कोरोना बाधितांची संख्या आहे. तर मृतांची संख्या १४५आहे. गुरुवारी एका दिवसात १७० अहवाल प्राप्त झाले. यात १६५निगेटिव्ह, ०५ पॉझिटिव्ह तर१९ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection to five new in solapur on thursday