धक्कादायक ! जुगाऱ्यांमुळे वाढतोय "या' गावात कोरोनाचा संसर्ग  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gambling

साडेआठ हजार लोकसंख्या असलेल्या लक्ष्मी दहिवडी गावामध्ये जुगार, दारू विक्री असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत आहेत. लॉकडाउन व कोरोनाच्या काळात हे अवैध धंदे सुरूच आहेत. अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू असून, शेजारच्या गावातील नागरिकही पत्ते खेळण्यास येत आहेत. त्या गावातही एकजण कोरोना पॉझिटिव्ह सापडला. सुरवातीला या पत्ते खेळणाऱ्यांमधील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामस्तरीय समितीने सर्वांचे गावातील शाळेत विलगीकरण केले. त्या वेळी त्यांचीही चाचणी केली असता त्या सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आली. 

धक्कादायक ! जुगाऱ्यांमुळे वाढतोय "या' गावात कोरोनाचा संसर्ग 

मंगळवेढा (सोलापूर) : साडेआठ हजार लोकसंख्या असलेल्या मंगळवेढा तालुक्‍यातील लक्ष्मी दहिवडीत जुगार खेळणाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात खळबळ उडाली असून, सध्या कोरोना रुग्णांची संख्या 26 झाली आहे. 

हेही वाचा : अबब..! रीडिंग शून्य अन्‌ वीजबिल दिले तीन लाख चाळीस हजार रुपयांचे, वाचा सविस्तर 

लक्ष्मी दहिवडी गावामध्ये जुगार, दारू विक्री असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत आहेत. लॉकडाउन व कोरोनाच्या काळात हे अवैध धंदे सुरूच आहेत. अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू असून, शेजारच्या गावातील नागरिकही पत्ते खेळण्यास येत आहेत. त्या गावातही एकजण कोरोना पॉझिटिव्ह सापडला. सुरवातीला या पत्ते खेळणाऱ्यांमधील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामस्तरीय समितीने सर्वांचे गावातील शाळेत विलगीकरण केले. त्या वेळी त्यांचीही चाचणी केली असता त्या सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाची लागण होऊ शकते, यासाठी प्रशासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करण्यासाठी गावात येऊन स्वॅब घेण्याचे नियोजन केले. मात्र, त्यांनी कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे लक्ष्मी दहिवडीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट घेण्यास आरोग्य प्रशासनही हतबल झाले असून, पोलिस प्रशासनावर ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. 

हेही वाचा : गणेशाची मूर्ती कशी असावी? स्थापना कधी, पूजा कशी करावी? जाणून घ्या पंचांगकर्ते दातेंकडून 

गावात सहा रुग्ण सापडल्यामुळे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांनीही दुकान उघडत गावात धान्य वाटप केले असून, त्यामध्ये एक दुकानदारही पॉझिटिव्ह आला. त्या दुकानदाराने सुमारे 150 लोकांना रेशनचे धान्य वाटप केल्याची चर्चा असून, आता हे पॉझिटिव्ह रुग्ण किती कुटुंबांना बाधित करणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. शाळेत विलगीकरण केलेल्यांनी कोव्हिड सेंटरमध्ये जाण्यास नकार देत प्रशासनाशी हुज्जत घालून "आमच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांची टेस्ट करायची नाही", असा हट्ट धरत "हाय रिस्क, लो रिस्क' संपर्कातील लोकांची नावे देण्यास नकार दिला. आमचेच रिपोर्ट प्रशासनाने खोटे दिले असल्याचा आरोप प्रशासनावर करत दिवसभर ग्रामस्तरीय समितीसोबत त्या रुग्णांनी हुज्जत घालत आरोग्य विभागाला दिवसभर गावात ताटकळत ठेवले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top