कोरोनाचा संसर्ग होतोय कमी ! शहर अन्‌ जिल्ह्यातील किती रुग्ण उपचार घेत आहेत? नक्‍की वाचा मग...

तात्या लांडगे
Tuesday, 12 January 2021

शहरात 'येथे' आढळले नवे रूग्ण
कस्तुरबा मार्केटजवळ (बुधवार पेठ), सहस्त्रार्जुन नगर, सिंधु विहार, जानकी नगर (जुळे सोलापूर), स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), विरशैव नगर, इंदिरा नगर (विजयपूर रोड), श्रीशैल नगर (भवानी पेठ), गांधी नगर, एमआयडीसी रोड, धुम्मा वस्ती (आशिर्वाद नगर) आणि न्यू बुधवार पेठ याठिकाणी शहरात आज नव्या 25 रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 85 संशयित होम क्‍वारंटाईन असून 18 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन आहेत. 36 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. शहरातील 12 रुग्ण बरे होऊन आज घरी परतले आहेत. 

सोलापूर : शहरात आज 604 संशयितांमध्ये 25 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये धुम्मा वस्ती (आशिर्वाद नगर) येथील 45 वर्षीय पुरुष, पश्‍चिम मंगळवार पेठेतील 84 वर्षीय पुरुषाचा आणि प्रतिक नगरातील 51 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील एक हजार 945 संशयितांमध्ये 45 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यात भोसरे (ता. माढा) येथील 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

शहरात 'येथे' आढळले नवे रूग्ण
कस्तुरबा मार्केटजवळ (बुधवार पेठ), सहस्त्रार्जुन नगर, सिंधु विहार, जानकी नगर (जुळे सोलापूर), स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), विरशैव नगर, इंदिरा नगर (विजयपूर रोड), श्रीशैल नगर (भवानी पेठ), गांधी नगर, एमआयडीसी रोड, धुम्मा वस्ती (आशिर्वाद नगर) आणि न्यू बुधवार पेठ याठिकाणी शहरात आज नव्या 25 रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 85 संशयित होम क्‍वारंटाईन असून 18 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन आहेत. 36 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. शहरातील 12 रुग्ण बरे होऊन आज घरी परतले आहेत.

ग्रामीण भागातील रूग्णसंख्या आता 38 हजार 679 झाली असून त्यातील एक हजार 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता 437 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यात 305 पुरुष आणि 132 महिलांचा समावेश आहे. मंगळवेढा, मोहोळ, सांगोला व दक्षिण सोलापूर या तालुक्‍यात आज (मंगळवारी) एकही रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे दक्षिण सोलापूर ग्रीन झोनमध्ये असून या तालुक्‍यात अवघे आठ रुग्ण शिल्लक आहेत. तर उत्तर सोलापूर तालुका कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून या तालुक्‍यातील तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आता अक्‍कलकोटमधील 14, बार्शीतील 40, करमाळ्यातील 57, माढ्यातील 72, माळशिरसमधील 51, मंगळवेढ्यातील 21, मोहोळमधील 25, पंढरपुरातील 122 आणि सांगोल्यातील 24 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection is less! How many patients are being treated in the solapur city and district? read this important news