शहरातील कोरोना ससंर्ग येतोय आटोक्‍यात! आज 42 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Monday, 3 August 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 36 हजार 437 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले पाच हजार 146 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील 367 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी; आज 61 रुग्णांना साडले घरी 
  • मार्कंडेय अन्‌ धनराज गिरजी रुग्णालयातील दोन रुग्णांचा झाला मृत्यू 
  • प्रभाग क्रमांक पाच आणि 23 मध्ये सर्वाधिक रुग्ण; प्रभाग अकरा अन्‌ 22 मध्ये शंभरपेक्षा कमी रुग्ण 

सोलापूर : शहरात आज नव्या 42 रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसी परिसरातील अनिता नगरातील 55 वर्षीय पुरुष तर विजयपूर रोडवरील सैफूल परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. मागील काही दिवसांत शहरात सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, आता 50 ते 55 च्या सरासरीने रुग्ण आढळत आहेत. 

राघवेंद्र नगर (विडी घरकूल), रविंद्र नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), प्रताप नगर (विजयपूर रोड), विजया हौसिंग सोसायटी (कुमठे), स्वामी विवेकानंद नगर, थोबडे वस्ती (देगाव नाका), मल्लिकार्जुन नगर (उत्तर कसबा), बुधवार पेठ, सिव्हिल क्‍वार्टर, सिध्देश्‍वर हौसिंग सोसायटी (भवानी पेठ), वसंत विहार फेज-दोन, न्यू पाच्छा पेठ, लोणार गल्ली, दक्षिण कसबा, दुरवांकुर बॅंक कॉलनी (इंदिरानगर), दाजी पेठ, हरिपदम रेसिडेन्सी, संजीता अपार्टमेंट, हरेकृष्ण विझर, गुलमोहर अपार्टमेंट, काडादी चाळ, तृप्ती कॉर्नरजवळ (मोदी), सुरवसे नगर (कुमठा नाका), आदित्य नगर (आरटीओजवळ), चेतक सोसायटी (मुरारजी पेठ), साठे-पाटील वस्ती, लक्ष्मी विष्णू चाळ, शास्त्री नगर आणि मुरारजी पेठ या परिसरात आज नवे रुग्ण सापडले आहेत. 

प्रभाग समित्यांनी थोपविला कोरोना 
पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी शहरातील सात पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानुसार महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या माध्यमातून शहरात प्रभागनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या. त्या समिती सदस्यांना बैठका घेणे, ऍन्टीजेन टेस्ट असो की कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदत केली. नगरसेवकांनीही त्यांच्या त्यांच्या प्रभागातील नागरिकांची सुरक्षितता म्हणून ऍन्टीजेन टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वत: लक्ष घालून अधिकाधिक नागरिकांच्या रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करुन घेतल्या. त्यामुळे शहरातील मृत्यूदर आणि कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 36 हजार 437 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले पाच हजार 146 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील 367 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी; आज 61 रुग्णांना साडले घरी 
  • मार्कंडेय अन्‌ धनराज गिरजी रुग्णालयातील दोन रुग्णांचा झाला मृत्यू 
  • प्रभाग क्रमांक पाच आणि 23 मध्ये सर्वाधिक रुग्ण; प्रभाग अकरा अन्‌ 22 मध्ये शंभरपेक्षा कमी रुग्ण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection in the Solapur city is under control Today, 42 positive and two died