कोरोनाने चुकवले सोलापूरकरांचे "रिंगण' : वारीची परंपरा खंडित 

Sakal Vari 2020.jpeg
Sakal Vari 2020.jpeg

सोलापूर : कोरोनामुळे आषाढी, कार्तिकीचा सोहळा झाला नाही. मात्र, आता कुठे कोरोनाचे रुग्ण कमी होऊन सर्व काही सुरळीत होत असतानाच कोरोनाचे रुग्ण वाढल्याने होईल होईल म्हणत यंदाची वारीही रद्द झाली आणि सोलापूरकरांची शेकडो वर्षांची पंरपरा असलेली माघी वारी यंदा चुकली. मागील दहा वर्षे सुरु असलेले प्रस्थान व रिंगण परंपरेतही यंदा खंड पडला आहे. 

देशभर आषाढी कार्तिकी वाऱ्यांना मोठे महत्त्व असले तरी सोलापूरकरांची वारी म्हणून माघी वारी ओळखली जाते. अनेक वर्षांपासून माघ वारी सोलापूरचा बहुभाषिक समाज मोठ्या प्रमाणात या वारीला पंढरपूरला जात असे. पूर्वी तट्या लावलेल्या अनेक बैलगाड्या सोलापूरहून पंढरपूरला जात असत. या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. 

2009 पासून ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे आणि अ.भा. वारकरी महामंडळाच्या प्रयत्नामुळे सोलापूरहून जाणाऱ्या 43 दिंड्याचे एकत्रित प्रस्थान करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. या सोहळ्याला 2012 पासून रिंगण सोहळ्याची जोड देण्यात आली. रिंगण प्रथेमुळे या सोहळ्याच्या वैभवात भर पडली होती. सुरवातीची दोन वर्षे होम मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडला त्यानंतर पाच वर्षे पार्क मैदानावर हा त्यांनतर दोन वर्षे नॉर्थ कोट मैदानावर हा सोहळा झाला. मार्केडेय मंदिर पंचकट्टा येथून दरवर्षी माघ शु.6 ला या दिंड्याचे प्रस्थान होत असे. पद्मशाली ज्ञाती संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी स्वागत होत असते. 
पंढरीचा वारकरी 
वारी चुकू न दे हरी 
चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचि दान 
पंढरीचा वारकरी 
वारी चुकू न दे हरी 

असे मागणी वारकरी करत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे वारी सोहळा न झाल्याची खंत वारकऱ्यांमध्ये आहे. या वारी सोहळ्याचे प्रवर्तक सोलापूर येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी सांगितले की, माघ शुद्ध दशमीला तुकाराम महाराजांना अनुग्रह झाला आहे. या दशमीला विशेष महत्त्व असून वारकरी या दशमीला पंढरपूरला जाणे महत्त्वाचे मानतात. सोलापूरला शेकडो वर्षापासून या वारीची पंरपरा आहे. आम्ही सर्व दिंड्यांचे संघटन करून प्रस्थान सोहळ्याचा प्रघात सुरू केला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com