दिलासादायक..... सोलापुरात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही 

दिलासादायक.....  सोलापुरात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही 


सोलापूर :  कोरोना टेस्ट साठी ज्या 31 नागरिकांच नमुने घेण्यात आले होते, ते सर्व निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे सोलापुरात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही. तसेच यामध्ये दिल्लीत हजरत निजामुद्दीन येथे मरकज या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचा ही समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

दिल्ली येथील हजरत निजामुद्दिन भागात तबलिके जमात या धार्मिक संस्थेने आयोजित केलेल्या मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यातून 25 जण सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या मेळाव्यात सहभागी झालेल्या 17 व्यक्तींची यादी विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली होती. या 17 मधील सहा व्यक्ती पर राज्यातील/पर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातून सहभागी झालेल्या 14 जणांचा पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक कार्यालयाने घेतल्याने जिल्ह्यातील सहभागी व्यक्तींची संख्या 25 वर गेली आहे. 

मेळाव्यात सहभागी झालेल्या व्यक्तींची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व पोलिसांच्यावतीने तातडीने सूत्र हलविण्यात आली. या सर्व सहभागी व्यक्तींना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. या 25 व्यक्तींच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून हे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 

निजामुद्दिन येथील मेळाव्यात सहभागी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील 17 जणांची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने देण्यात आल्यानंतर नूसार त्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. 17 जणांपैकी फक्त 11 व्यक्तीच सोलापूर शहर व जिल्ह्यात असल्याचे समोर आले आहे. उर्वरित सहा व्यक्तींपैकी ठाणे व दिल्ली या ठिकाणी प्रत्येकी दोन व्यक्ती असल्याचे समोर आले. एक व्यक्ती टिपनगड तर एक व्यक्ती पुण्यात असल्याचे या पाहणीत समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com