आषाढीच्या तोंडावर पंढरपुरात आढळला कोरोनाचा रूग्ण 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 28 जून 2020

प्रदक्षिणा मार्गावर आढळला रूग्ण 
ऐन आषाढी यात्रा काळात शहरातील प्रदक्षिणा मार्गावर रूग आढळून आल्याने पंढरपूरकरांची चिंता वाढली आहे. यापूर्वी पंढरपूरसह उपरी, कासेगाव, करकंब, गोपाळपूर आणि बार्डी येथे येथे रूग्ण आढळून आले आहेत. 

पंढरपूर (सोलापूर) : देशात आणि राज्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाच आता पंढरपुरातही कोरोनाचा रूग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. परंपरा म्हणून नऊ मानाच्या पालख्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आलेला असतानाच पंढरपुरात कोरोनाचा आणखी एक रूग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत शहर व तालुक्‍यातील कोरोनाबाधित रूग्णाची संख्या दहा झाली आहे. 
ऐन आषाढी यात्रा काळात शहरातील प्रदक्षिणा मार्गावर रूग आढळून आल्याने पंढरपूरकरांची चिंता वाढली आहे. यापूर्वी पंढरपूरसह उपरी, कासेगाव, करकंब, गोपाळपूर आणि बार्डी येथे येथे रूग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रूग्ण उपचारानंतर बरे झाले होते. त्यामुळे शहर व तालुका कोरोना मुक्त झाला होता. पंधरा दिवसानंतर शहरात आणखी एक रूग्ण सापडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient was found in Pandharpur on the mouth of Ashadi