सोलापुरात 516 कोरोनाबाधित, आज सकाळी वाढले 28 रूग्ण,  तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

सोलापूर शहर व परिसरात आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोनाबाधितचे 28 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 14 पुरुष व 14 महिलांचा समावेश आहे. 28 रुग्ण वाढल्याने सोलापुरातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोनाबाधितचे 28 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 14 पुरुष व 14 महिलांचा समावेश आहे. 28 रुग्ण वाढल्याने सोलापुरातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत तीन पुरुषांचा मृत्यू झाला असून सोलापुरातील एकूण मृत व्यक्तींची संख्या आता 37 झाली आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीची संख्या 218 झाली असून सोलापूर शहरात कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या सर्वांच्या चिंतेचा विषय झाली आहे. सोलापुरातील पाच हजार 122 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4606 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 516 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 488 एवढी होती. एका रात्रीत 28 रूग्ण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Corona patients count in Solapur 516