esakal | जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक ! शहरात 363 तर ग्रामीणमध्ये 714 रुग्ण; 18 जणांचा कोरोनाने घेतला बळी

बोलून बातमी शोधा

102Child_Mask_0_20_20Copy_3.jpg

ठळक बाबी...

 • शहर-ग्रामीणमध्ये आतापर्यंत झाल्या नऊ लाख तीन हजार 55 कोरोना टेस्ट
 • आतापर्यंत जिल्ह्यातील 70 हजार 38 जणांना झाली कोरोना बाधा
 • एकूण रुग्णांपैकी 59 हजार 543 रूग्णांची कोरोनावर मात; दोन हजार 90 जणांनी गमावला जीव
 • सध्या शहरात तीन हजार 537 तर ग्रामीणमधील चार हजार 868 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
 • आज ग्रामीणमध्ये आढळले 714 रुग्ण; सातजणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू
 • शहरात आज आढळले 363 रुग्ण; 11 जणांना कोरोनाने घेतला बळी
जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक ! शहरात 363 तर ग्रामीणमध्ये 714 रुग्ण; 18 जणांचा कोरोनाने घेतला बळी
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील तब्बल 257 ठिकाणी आज 363 रूग्ण आढळले असून त्यात होटगी रोड, जुळे सोलापूर, विजयपूर रोडवरील सर्वाधिक रुग्ण आहेत. ग्रामीण भागात आज 714 रुग्ण आढळले असून त्यात पंढरपूर, माळशिरस, करमाळा, बार्शी, माढा या तालुक्‍यातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे चिंतेची बाब म्हणजे शहरातील 11 तर ग्रामीणमधील सातजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी...

 • शहर-ग्रामीणमध्ये आतापर्यंत झाल्या नऊ लाख तीन हजार 55 कोरोना टेस्ट
 • आतापर्यंत जिल्ह्यातील 70 हजार 38 जणांना झाली कोरोना बाधा
 • एकूण रुग्णांपैकी 59 हजार 543 रूग्णांची कोरोनावर मात; दोन हजार 90 जणांनी गमावला जीव
 • सध्या शहरात तीन हजार 537 तर ग्रामीणमधील चार हजार 868 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
 • आज ग्रामीणमध्ये आढळले 714 रुग्ण; सातजणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू
 • शहरात आज आढळले 363 रुग्ण; 11 जणांना कोरोनाने घेतला बळी

कोरोनाची साखळी खंडीत करून रुग्ण व मृत्यूदर कमी करण्याच्या हेतूने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही, रुग्ण वा मृत्यूदर थांबत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोलापुरात कोरोनाचे आगमन होऊन 12 एप्रिलला वर्ष पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी, जिल्ह्यातील 70 हजारांहून अधिक व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून मृतांची संख्या एकविसशेच्या उंबरठ्यावर आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले, परंतु ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढल्याचे चित्र मागील वर्षभरात पहायला मिळाले. गरीब, झोपडपट्ट्यांच्या परिसरातील कोरोनाने आता हौसिंग सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये शिरकाव केला आहे. हातावरील पोट असलेल्या बहुतेक नागरिकांनी नियमांचे पालन करीत, विनाकारण घराबाहेर पडणेच बंद केले. मात्र, विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही. त्यामुळे वर्षानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसत नाही. आता तरी नागरिकांनी संभाव्य धोका ओळखून नियमांचे तंतोतंत पालन करावे, हीच अपेक्षा.

तालुकानिहाय वाढलेले आजचे रूग्ण
पंढरपूर (142), बार्शी (129), माळशिरस (102), माढा (91), करमाळा (72), मंगळवेढा (56), मोहोळ (35), उत्तर सोलापूर (27), दक्षिण सोलापूर (21), अक्‍कलकोट (20), सांगोला (19).