अबब.. आतापर्यंत १३ हजार जणांवर कारवाई

अबब.. आतापर्यंत १३ हजार जणांवर कारवाई

सोलापूर : प्रतिबंधित परिसरातील 36 व्यक्तींनी विनापरवाना दुसऱ्या परिसरात जाण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत तीन हजार 895 वाहने जप्त केली असून सुमारे 13 हजार जणांविरुद्ध पोलिस कारवाई करण्यात आली आहे. 
पाच्छा पेठ, बालाजी चौक, 70 फूट रोड अमरपाली चौक, संगम बेकरी, बेगम पेठ, अलकुंटे चौक, मजरेवाडी, लोकमान्यनगर, भीमाशंकरनगर, भवानी पेठ, गुजरवस्ती परिसरातील व्यक्ती विनापरवाना दुसऱ्या परिसरात जाण्याच्या तयारीत होते. त्यामुळे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाणे, एमआयडीसी, सदर बझार, विजापूर नाका आणि जेल रोड पोलिस ठाण्याअंतर्गत 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र


आतापर्यंतची पोलिस कारवाई 
- तीन हजार 601 दुचाकी, 197 रिक्षा आणि 97 चारचाकी वाहने जप्त 
- अफवा पसरवणे, आदेशाचे उल्लंघनप्रकरणी दोन हजार 754 गुन्हे दाखल 
- मोटार व्हेईकल कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी 12 हजार 48 जणांविरुद्ध कारवाई 
- आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने एक हजार 75 जणांविरुद्ध गुन्हे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com