सोलापूर ग्रामीणमधील कोरोना शहराला करतोय ओव्हरटेक ! 291 पॉझिटिव्ह अन्‌ आठ जणांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Friday, 7 August 2020

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांत आतापर्यंत 36 हजार 409 कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत तालुक्‍यांमध्ये सापडले चार हजार 875 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 
  • जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 144 बळी; दोन हजार 945 रुग्णांची कोरोनावर मात 
  • तीन हजार 82 व्यक्‍तींची एकाच दिवशी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट; 291 पॉझिटिव्ह 
  • बार्शीने ओलांडला एक हजाराचा टप्पा; दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अक्‍कलकोटमध्येही लक्षणीय रुग्ण 

सोलापूर : अक्‍कलकोट, बार्शी, मोहोळ या शहरांसह तालुक्‍यातील 36 गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाउन करुनही ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात आला नाही. या पार्श्‍वभूमीवर गावोगावी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट वाढविल्या असून गुरुवारी (ता. 6) ग्रामीणमध्ये तीन हजार 82 व्यक्‍तींची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 291 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांत आतापर्यंत 36 हजार 409 कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत तालुक्‍यांमध्ये सापडले चार हजार 875 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 
  • जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 144 बळी; दोन हजार 945 रुग्णांची कोरोनावर मात 
  • तीन हजार 82 व्यक्‍तींची एकाच दिवशी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट; 291 पॉझिटिव्ह 
  • बार्शीने ओलांडला एक हजाराचा टप्पा; दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अक्‍कलकोटमध्येही लक्षणीय रुग्ण 

अक्‍कलकोटमधील बॅंक ऑफ इंडिया, हत्तीकणबस, जेऊर, किणी, कोर्सेगाव, बार्शीतील बावी, भवानी पेठ, चिंचोली, धामणगाव, घारी, हालदुगे, इर्ले, जळगाव, कुसळंब, मंगळवार पेठ, मळेगाव, मुंगशी, राऊत गल्ली, सनगर गल्ली, सारोळे, सासुरे, सोलापूर रोड, सौंदरे, तावडी, उंबरगे, तडवळे, उपळे दुमाला, वैराग, वाणी प्लॉट, यशवंत चौक येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. करमाळ्यातील भीम नगर, दहिगाव, फंड गल्ली, गणेश नगर, कानड गल्ली, कृष्णाजी नगर, नवीन नगरपालिकेसोर, शेळगाव (वा) सिध्दार्थ नगर, सुमंत नगर येथे माढ्यातील भांगे गल्ली, उपळाई बु. दारफळ, मानेगाव, कुर्डूवाडीतील परंडा रोड, सातव कॉलनी, शिवप्रतिष्ठान येथे नवे रुग्ण सापडले. तर माळशिरसमधील अकलूज, बोरगाव, गिरझनी, कन्हेर, लवंग, महाळूंग, माळीनगर, माळखांबी, नेवरे, संगम, सवतगाव, शिंदेवाडी, वेळापूर, विझोरी, वाफेगाव येथे तर मंगळवेढ्यातील अंधळगाव, अरळी, कर्जाळ, मरवड, पंढरपूर रोड, सलगर बु., मोहोळमधील अनगर, हराळवाडी, पाटकूल, वडवळ, उत्तर सोलापुरातील गावडी दारफळ, कळमण, साखरेवाडी, पंढरपुरातील आढीव, अनिल नगर, भोसे, गांधी रोड, इंदिरा गांधी भाजी मार्केट, जुना कराड नाका, जुना सोलापूर नाका, जुनी पेठ, करकंब, खेड भोसे, कोळी गल्ली, लिंक रोड, महाद्वार, महात्मा फुले नगर, मेंढापूर, नागपूरकर मठ, नाथ चौक, केबीपी कॉलेजजवळ, एमएसईबीजवळ, पिराची कुरोली, रामबाग, रोपळे, संतपेठ, सावरकर नगर, सावता माळी मठ, शेगाव दु., उमडे गल्ली, विरसागर नगर, सांगोल्यातील बलवडी, चिंचोळी रोड, यलमार मंगेवाडी, दक्षिण सोलापुरातील बोरामणी, औज आ., मंद्रूप, वळसंग आणि नवीन विडी घरकूल या ठिकाणी नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 

'या' गावात कोरोनाचे बळी 
मंगळवेढ्यातील लक्ष्मी दहिवाडी 66 वर्षीय पुरुषाचा, बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमधील 50 वर्षीय पुरुषाचा, हिरेमठ हॉस्पिटलमधील 67 वर्षीय पुरुषाचा, घारी येथील 87 वर्षीय पुरुषाचा, दत्त नगरातील 63 वर्षीय पुरुषाचा, आडवा रस्ता परिसरातील 60 वर्षीय पुरुषाचा, माळशिरसमधील लवंग येथील 73 वर्षीय पुरुषाचा आणि अकलूज येथील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in rural Solapur is overtaking! 291 positive and eight deaths