नगरसेवकांमुळे थांबतोय झोपडपट्ट्यांमधील कोरोना ! प्रभाग 22 मध्ये उरले 15 रुग्ण

तात्या लांडगे
Wednesday, 18 November 2020

प्रभाग 22 'अ'अंतर्गत परिसर कोरोनामुक्‍त
गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक एक व दोन, आम्रपाली चौक, सोनिया नगर, सिध्देश्‍वर नगर, मोरया सोसायटी, शांती नगर बेघर सोसायटी, यतिम खाना, सोनी नगर येथे सुरवातीला कोरोनाचे रुग्ण आढळत होते. या पार्श्‍वभूमीवर नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, ते सुरक्षित राहावेत म्हणून शिधापत्रिका बंद असलेल्यांसह शिधापत्रिका नसलेल्यांनाही धान्य मिळवून दिले. गरजूंना मोफत धान्य दिल्याने ते घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे आता प्रभाग 22 'अ'अंतर्गत परिसर कोरोनामुक्‍त झाला आहे. 
- पुनम बनसोडे, नगरसेविका

सोलापूर : झोपडपट्टी परिसरात कामगार वर्ग मोठा असलेला प्रभाग 22 हा आहे. नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना वॉरिअर्सच्या माध्यमातून घरोघरी जनजागृती केली. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या प्रभागातील नागरिक सुरक्षित राहावेत, कोणीही कोरोनाचा बळी ठरु नये म्हणून नगरसेवकांनी घरोघरी जाऊन मास्क, सॅनिटायझर, साबण वाटप केले. नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने या प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमीच राहिला.

 

प्रभाग 22 'अ'अंतर्गत परिसर कोरोनामुक्‍त
गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक एक व दोन, आम्रपाली चौक, सोनिया नगर, सिध्देश्‍वर नगर, मोरया सोसायटी, शांती नगर बेघर सोसायटी, यतिम खाना, सोनी नगर येथे सुरवातीला कोरोनाचे रुग्ण आढळत होते. या पार्श्‍वभूमीवर नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, ते सुरक्षित राहावेत म्हणून शिधापत्रिका बंद असलेल्यांसह शिधापत्रिका नसलेल्यांनाही धान्य मिळवून दिले. गरजूंना मोफत धान्य दिल्याने ते घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे आता प्रभाग 22 'अ'अंतर्गत परिसर कोरोनामुक्‍त झाला आहे. 
- पुनम बनसोडे, नगरसेविका

 

शहरात आतापर्यंत दहा हजार सात रुग्ण आढळले आहेत. त्यात 31 ते 50 वयोगटातील सर्वाधिक तीन हजार 488 रुग्ण असून 51 ते 60 वयोगटातील एक हजार 644 रुग्ण आहेत. तर 60 वर्षांवरील एक हजार 835 रुग्ण आहेत. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू 60 वर्षांवरील 345 रुग्णांचा झाला आहे. आपल्या प्रभागातील को- मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरणार नाहीत, गोरगरिबांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनापासून दूर राहावेत म्हणून नगरसेवकांनी लॉकडाउन काळात शिधापत्रिका असलेल्यांसह धान्य न मिळणाऱ्यांनाही मदत केली. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना वाढू नये म्हणून आरोग्य शिबिरे, रॅपिड ऍन्टीजेन टेस्टची मोहीम राबविली. त्यामुळे आता हा प्रभाग कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करीत असून त्यासाठी नगरसेविका पुनम बनसोडे, सुवर्णा जाधव, नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड यांचे प्रयत्न सुरु आहेत.

 

प्रभागाविषयक ठळक बाबी...

  • आतापर्यंत 186 जण कोरोना पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी 159 जणांनी केली कोरोनावर मात
  • आतापर्यंत 12 जणांचा कोरोनाने घेतला बळी
  • प्रभागात आता उरले 15 ऍक्‍टिव्ह रुग्ण

बहूतांश नगरांमधून हद्दपार होतोय कोरोना
भैरु वस्ती, लिमयेवाडी, सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक दोन ते पाच, भूषण नगर, दोन नंबर झोपडपट्टी, इरण्णा वस्ती, रामवाडी, धोंडीबा वस्ती या परिसरात जनजागृतीवर भर दिला. गरजूंना धान्य, मास्क वाटप केले. नागरिकांनी नियमांचे पालन करीत विनाकारण घराबाहेर जाणे टाळले. त्यामुळे आता या प्रभागातील रुग्णसंख्या कमी झाली असून काही नगरांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे थांबत आहे. 
- सुवर्णा जाधव, नगरसेविका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in slums areas stopped because of corporators! The active patients 15 in Wards 22