शहरातील कोरोना झाला कमी ! आज एक हजार 788 टेस्टमध्ये अवघे 24 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Friday, 30 October 2020

ठळक बाबी.... 

  • शहरातील 94 हजार 217 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले नऊ हजार 533 रुग्ण आढळले 
  • आज एक हजार 788 संशयितांपैकी 24 सापडले पॉझिटिव्ह 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये राहिले 96 संशयित, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 66 संशयित 
  • शहरातील आठ हजार 557 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आता उरले 443 रूग्ण 

सोलापूर : शहरातील बहुतांश उद्योग, व्यवसाय अनलॉक झाल्यानंतरही कोरोनाची स्थिती आता सुधारली आहे. आज एक हजार 788 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात अवघे 24 जण पॉझिटिव्ह सापडले असून विशेष म्हणजे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आता शहरात अवघे 443 रुग्ण उरले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. स्वत: झोपडपट्टी परिसरात जाऊन नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह खासगी डॉक्‍टरांना सक्‍त सूचना करुन आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी ठोस नियोजन केले. स्वत: कोरोना बाधित झाले, तरीही त्यांनी शहरातील शिक्षकांच्या मदतीने घरोघरी सर्व्हे सुरुच ठेवला. त्यामुळे आता शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. 

ठळक बाबी.... 

  • शहरातील 94 हजार 217 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात सापडले नऊ हजार 533 रुग्ण आढळले 
  • आज एक हजार 788 संशयितांपैकी 24 सापडले पॉझिटिव्ह 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये राहिले 96 संशयित, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 66 संशयित 
  • शहरातील आठ हजार 557 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आता उरले 443 रूग्ण 

शहरात आज आदित्य नगर, मंत्री चंडक (विजयपूर रोड), जवाहर सोसायटी (अंत्रोळीकर नगर), ओम नम:शिवाय नगर (हत्तुरे वस्ती), निरापम सोसायटी (अशोक नगर), बुधवार पेठ, जुना विडी घरकूल, चौरे बिल्डींग (खडक गल्ली, बाळे), लक्ष्मी नगर (बाळे), संत तुकाराम नगर (सैफूल), दमाणी नगर, मेडिकल कॉलनी (जुळे सोलापूर), कर्णिक नगर, अरविंदधाम वसाहत, अभिषेक पार्क (लक्ष्मी पेठ), शेळगी (गावठाण), आद्यि नगर (लोखंडवाला रेसिडेन्सी), एकता नगर आणि पद्मा नगर येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत सोलापूर शहरातील नऊ हजार 533 पैकी 533 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केलेल्या नियोजनाला पोलिसांची साथ मिळाल्याने शहरातील स्थिती आता सुधारु लागली आहे. तरीही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कचा वापर नियिमित करावा, असे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. जेणेकरुन पुन्हा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असा विश्‍वास त्यामागे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona in the solapur city became less! Today, only 24 positives in 1,788 tests