शहराच्या तुलनेत सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना सुसाट! आज 285 पॉझिटिव्ह अन्‌ सात मृत्यू 

coronavirus-shutterstock.jpg
coronavirus-shutterstock.jpg

सोलापूर : ग्रामीणमधील दोन हजार 449 व्यक्‍तींची सोमवारी (ता. 10) कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 285 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह सापडले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बार्शीतील जवळगाव, सोलापूर रोड, हळदुगे, कसबा पेठ, सिध्दार्थ नगर, माढ्यातील म्हैसगाव, माळशिरसमधील माळीनगरातील रुग्णांचा समावेश आहे. 

दक्षिण सोलापुरातील औराद, वळसंग, औज (मं.), मोहोळमधील अनगर, गुलमोहर पार्क, कन्हेरी, खंडाळी, कुंभार खणी, पाटकूल, शेटफळ, सिध्दार्थ नगर, अक्‍कलकोटमधील दत्त नगर, कुरनूर, तडवळ, हैद्रा, मंगळवेढ्यातील तळसंगी, आडवा रस्ता, अलिपूर रोड, भवानी पेठ, ब्राह्मण गल्ली, बुरुड गल्ली, डाणे गल्ली, दत्त नगर, एकविराई मंदिराजवळ, गादेगाव रोड, घारी, हिरेमठ प्लॉट, जावळे प्लॉट, कसबा पेठ, लहूजी नगर, मांगाडे चाळ, नाईकवाडी प्लॉट, नाळे प्लॉट, रेल्वे स्टेशन रोड, सोलापूर रोड, सुभाष नगर, वैराग, वाणी प्लॉट, ऐनापूर रोड, झाडबुके मैदान, झोंबाडे गल्ली, करमाळ्यातील अर्जून नगर, भगतवाडी, दहिगाव, रंभापूर, शिवाजी नगर, सुतार गल्ली, उत्तर सोलापुरातील गावडी दारफळ, हिरज, कवठे, पडसाळी, वडाळा, माढ्यातील कुर्डू, मोडनिंब, पिंपळनेर, शुक्रवार पेठ, माळशिरसमधील फोंडशिरस, नातेपुते, माळेवाडी (अ.), शेंडेचिंच, यशवंत नगर येथे नवे रुग्ण सापडले आहेत. पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, आंबेडकर नगर, अनिल नगर, बादलकोट, भजनदास चौक, भक्‍ती मार्ग, भंडीशेगाव, भोसे, चौफळा, धोंडेवाडी, गादेगाव, गांधी रोड, गाताडे प्लॉट, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा, हरिदास वेस, ईसबावी, ईश्‍वरवठार, जुनी माळी गल्ली, जुनी पेठ, करोळे, कासेगाव रोड, कासेगाव, काशी कापड गल्ली, खर्डी, किश्‍ते गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मी टाकळी, महाद्वार, मेंढे गल्ली, नारायण चिंचोली, नाथ चौक, हनुमान मंदिराजवळ, ओझेवाडी, पद्मावती झोपडपट्‌टी, रामबाग, रोपळे, समता नगर, संभाजी चौक, सांगोला रोड, संत पेठ, सरकोली, सावरकर नगर, शंकुतला नगर, शेगाव (दु.), शिवरत्न नगर, स्टेशन रोड, सुलेमान चाळ, तांबेकर गल्ली, तारे गल्ली, तुंगत, उमदे गल्ली, उमदी पटांगण, उंबरे पागे, वाखरी, सांगोल्यातील खवसपूर, चिकमहूद, जवळा, लक्ष्मी दहिवडी, महूद बु., नाझरे आणि वासूद येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

ठळक बाबी... 

  1. ग्रामीणमधील 48 हजार 855 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  2. आतापर्यंत ग्रामीण भागात सापडले सहा हजार 187 रुग्ण 
  3. ग्रामीणमधील तीन हजार 561 रुग्णांची कोरोनावर मात; दोन हजार 447 रुग्णांवर उपचार 
  4. आज सात रुग्णांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या 179 झाली 

तालुकानिहाय रुग्ण अन्‌ मृत रुग्ण 
तालुका                    एकूण रुग्ण     मृत्यू 

  • अक्‍कलकोट   567            28 
  • बार्शी            1243           55 
  • करमाळा       274             3 
  • माढा             447            12 
  • माळशिरस     490            7 
  • मंगळवेढा      203             2 
  • मोहोळ          379            11 
  • उत्तर सोलापूर 416           17 
  • पंढरपूर         1214          26 
  • सांगोला          227            3  
  • दक्षिण सोलापूर 727        15 
  • एकूण             6,187      179  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com