कोरोनावरील लस आज सोलापुरात येणार ! जनजागृतीसाठी शिक्षकांची घेतली जाणार मदत 

तात्या लांडगे
Wednesday, 13 January 2021

ठळक बाबी... 

 • कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आज सोलापुरात दाखल होणार 
 • पहिल्या टप्प्यात 34 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना टोचली जाणार लस 
 • शासकीय, खासगी डॉक्‍टर, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे पहिल्या टप्यात लसीकरण 
 • शहर- जिल्ह्यातील 16 केंद्रांवर लसीकरणाची सोय; सहाशे कर्मचाऱ्यांची केली नियुक्‍ती 
 • दररोज शंभरजणांना दिली जाणार लस; वेळ, ठिकाणाची माहिती मोबाईलवर मिळणार 

  सोलापूर​ : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आज (बुधवारी) सोलापुरात दाखल होणार आहे. ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवली जाणार आहे. त्याची व्यवस्था 16 केंद्रांवर करण्यात आली आहे.

  ठळक बाबी... 

  • कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आज सोलापुरात दाखल होणार 
  • पहिल्या टप्प्यात 34 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना टोचली जाणार लस 
  • शासकीय, खासगी डॉक्‍टर, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे पहिल्या टप्यात लसीकरण 
  • शहर- जिल्ह्यातील 16 केंद्रांवर लसीकरणाची सोय; सहाशे कर्मचाऱ्यांची केली नियुक्‍ती 
  • दररोज शंभरजणांना दिली जाणार लस; वेळ, ठिकाणाची माहिती मोबाईलवर मिळणार 

  सोलापूर शहर- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होऊ लागला आहे. आतापर्यंत शहरातील 11 हजार 350 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जिल्ह्यातील 38 हजार 678 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. सुरवातीच्या काळात सोलापूर शहराचा मृत्यूदर देशातील टॉपटेन शहरांमध्ये होता. आता मृत्यूचे प्रमाण घटले असले तरीही, अद्याप पूर्णपणे कमी झालेले नाही. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनंतर फ्रंट लाईनवर काम करणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी, प्रतिबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. त्याची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरली जाणार आहे. लसीकरण ऐच्छिक असून ज्यांना लस टोचायली आहे, त्यांना मोफत लस दिली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात आज लस येणार असून ती लस प्रत्येक लसीकरणाच्या केंद्रांवर पोहचविली जाणार आहे. सोलापूर शहरातील सर्वोपचार रुग्णालयासह चार नागरी आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. शहर- जिल्ह्यात लसीकरणासाठी एकूण 16 केंद्रे निश्‍चित केली आहेत. गरज पडल्यास जनजागृतीसाठी शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी दिली.

  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Corona vaccine to arrive in Solapur today! Teachers will be assisted for public awareness