धक्‍कादायक! सोलापुरातील 'एवढ्या' भाजी विक्रेत्यांना कोरोना

तात्या लांडगे
Wednesday, 12 August 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील कोरोना संशयितांच्या शोधासाठी महापालिकेतर्फे 480 पथके 
  • विडी, वस्त्रोद्योग, बाजार समितीतील कामगारांची होणार ऍन्टीजेन टेस्ट 
  • गाळेधारकांसह भाजी विक्रेत्यांनाही टेस्ट बंधनकारक ; आयुक्‍तांचे आदेश 
  • आठ दिवसांत टेस्ट करुन न घेणाऱ्यांना आयुक्‍तांनी दिला कारवाईचा इशारा 
  • विजयपूर रोड आणि आसरा परिसरातील 63 भाजी विक्रेत्यांमध्ये 16 जण पॉझिटिव्ह 

सोलापूर : विजयपूर रोड आणि आसरा परिसरातील 63 भाजी विक्रेत्यांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट महापालिकेने केली. त्यामध्ये तब्बल 11 भाजी विक्रेत्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला. ही बाब चिंता वाढविणारी असल्याने आता महापालिका आयुक्‍तांनी भाजी विक्रेत्यांसह विडी कामगार, वस्त्रोद्योगातील व कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामगार, व्यापारी, गाळेधारकांना टेस्ट करुन घेणे बंधनकारक करण्याचा आदेश काढला. 

शहरातील साडेदहा लाख लोकसंख्येपैकी सुमारे दोन लाख को-मॉर्बिड व्यक्‍तींना उद्यापासून (ता. 13) कार्डचे वाटप केले जाणार आहे. या नागरिकांवर आगामी दोन महिन्यांपर्यंत वॉच ठेवला जाणार असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असेही महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सांगितले. दुसरीकडे गाळेधारक, व्यापारी, विडी व वस्त्रोद्योगातील कामगार, बाजार समितीतील व्यापारी, कामगारांना टेस्ट करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशानंतरही टेस्ट करुन न घेणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्‍तांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. नागरिकांना भाजीपाला विक्री करणाऱ्या सर्वांनी ऍन्टीजेन टेस्ट करुन घ्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा आदेशामागील उद्देश आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील कोरोना संशयितांच्या शोधासाठी महापालिकेतर्फे 480 पथके 
  • विडी, वस्त्रोद्योग, बाजार समितीतील कामगारांची होणार ऍन्टीजेन टेस्ट 
  • गाळेधारकांसह भाजी विक्रेत्यांनाही टेस्ट बंधनकारक ; आयुक्‍तांचे आदेश 
  • आठ दिवसांत टेस्ट करुन न घेणाऱ्यांना आयुक्‍तांनी दिला कारवाईचा इशारा 
  • विजयपूर रोड आणि आसरा परिसरातील 63 भाजी विक्रेत्यांमध्ये 16 जण पॉझिटिव्ह 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to vegetable sellers in Solapur city