esakal | निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! नियम पाळून कामगारांनी हद्दपार केला कोरोना 
sakal

बोलून बातमी शोधा

02Child_Mask_0 - Copy.jpg

प्रभागाविषयक ठळक बाबी... 

  • आतापर्यंत 310 कोरोना बाधित 
  • एकूण रुग्णांपैकी 283 रुग्ण झाले बरे 
  • आतापर्यंत 21 जणांचा झाला मृत्यू 
  • सध्या प्रभागात उरले सहा रुग्ण 

निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! नियम पाळून कामगारांनी हद्दपार केला कोरोना 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कामगार वस्तीच्या 13 नंबर प्रभागातून कोरोनाने काढता पाय घेतला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या प्रभागातील नगरसेविका प्रतिभा मुदगल, कामिनी आडम, नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले, सुनिल कामाठी यांच्यासह तरुणांनी लोकसेवा केली. त्यामुळे या प्रभागात आता सहा रुग्ण उरले असून हा प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर उभा आहे.

प्रभागाविषयक ठळक बाबी... 

  • आतापर्यंत 310 कोरोना बाधित 
  • एकूण रुग्णांपैकी 283 रुग्ण झाले बरे 
  • आतापर्यंत 21 जणांचा झाला मृत्यू 
  • सध्या प्रभागात उरले सहा रुग्ण 

शहरात आतापर्यंत 15 वर्षांपर्यंत वयोगट असलेल्या 831 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 16 ते 30 वयोगटातील सर्वाधिक दोन हजार 157 रुग्णांना कोरोनाची लागण झाली. तसेच 31 ते 50 वयोगटातील तीन हजार 420 आणि 51 ते 60 वयोगटातील एक हजार 603 व्यक्‍तींना, तर 60 वर्षांवरील एक हजार 786 रुग्णांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना सर्वाधिक कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. तर विडी कामगार, वस्त्रोद्योगात काम करणाऱ्यांचे मृत्यू सुरुवातीला सर्वाधिक झाले. मात्र, महापालिका प्रशासन व पोलिसांच्या मदतीने नगरसेवकांनी घरोघरी जाऊन प्रबोधन केले. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास मदत झाली. 


प्रभागातील काही नगरांमधून हद्दपार झाला कोरोना 
बापूजी नगरासह अन्य भागात आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच तरुणांनी अनेक रुग्णांची सेवा करीत त्यांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून परिश्रम घेतले. बापूजी नगरासह अन्य नगरे आता कोरोनामुक्‍त झाली आहेत. गरजूंना धान्य वाटप केले तर शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास दुसरी लाट येणारच नाही. 
- कामिनी आडम, नगरसेविका 


नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने झाले शक्‍य 
प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेतली. सिध्देश्‍वर हौसिंग सोसायटीतील नागरिकांना धान्य वाटप केले. मास्क, सॅनिटायझरचेही वाटप केले. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून वारंवार प्रबोधन केले. आता प्रभाग कोरोनामुक्‍त होत असून नागरिकांनी मोठे सहकार्य केले. नियमांचे तंतोतंत पालन केल्यास काही दिवसांत प्रभाग कोरोनामुक्‍त होईल. 
- प्रतिभा मुदगल, नगरसेविका 

go to top