सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा पुन्हा विक्रम; एकाच दिवशी 283 बाधित 

संतोष सिरसट 
Thursday, 6 August 2020

नव्याने बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आजची रुग्णसंख्या 
अक्कलकोट-19, बार्शी-63, करमाळा-16, माढा-24, माळशिरस-29, मंगळवेढा-27, मोहोळ-3, उत्तर सोलापूर-11, पंढरपूर-65, सांगोला-6, दक्षिण सोलापूर-20, एकूण-283. 

सोलापूर ः सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. बुधवारी (ता. 5) रात्री बारावाजेपर्यंत जिल्ह्यात 283 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याचा हा विक्रम झाला आहे. त्याचबरोबर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर शहराच्या हद्दीत मर्यादेत असलेला कोरोना आता जिल्ह्याच्या प्रत्येक गावात घुसू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांकडून होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज एकूण दोन हजार 117 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यातील एक हजार 887 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 283 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या चार हजार 484 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अक्कलकोटमधील फत्तेसिंह चौकातील 65 वर्षीय पुरुष, अकलूज येथील 54 व 60 वर्षीय पुरुष, आगळगाव (ता. बार्शी) येथील 60 वर्षीय महिला, बावी येथील 55 वर्षाची महिला, महूद (ता. सांगोला) येथील 90 वर्षीय पुरुष, पापनस (ता. माढा) येथील 87 वर्षाचे पुरुष, घोंडगे गल्ली पंढरपूर येथील 82 वर्षीय पुरुष, भोसे (ता. पंढरपूर) येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आतापर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या 
अक्कलकोट-527, बार्शी-976, करमाळा-186, माढा-347, माळशिरस-293, मंगळवेढा-159, मोहोळ-311, उत्तर सोलापूर-328, पंढरपूर-684, सांगोला-137, दक्षिण सोलापूर-636, एकूण-4584 

आज या गावात आढळले रुग्ण 
अक्कलकोटमधील ए-वन चौक, बॅंक ऑफ इंडिया, समाधी मठ, स्टेशन रोड, अंकलगी, चपळगाव, दुधनी, कडबगाव, कोर्सेगाव, नन्हेगाव, करमाळा तालुक्‍यातील भीमनगर, घोलपनगर, कानड गल्ली, किल्ला विभाग, मेहद्दीन तालीम, साठेनगर, सिद्धार्थनगर, विद्यानगर, देवीचा माळ, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, चाकोरे, फोंडशिरस, महाळुंग, माळेवाडी, संग्रामनगर, विझोरी, तांदूळवाडी, मंगळवेढ्यातील शनिवारपेठ, चोखामेळानगर, डोंगरगाव, मरवडे, मोहोळ तालुक्‍यातील औंढी, पेनूर, दत्तनगर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गावडी दारफळ येथे एक, नान्नज येथे दहा रुग्ण सापडले. सांगोला तालुक्‍यातील महूद, खिलारवाडी, कडलास नाका, यलमागर मंगेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील औराद, होटगी, मंद्रूप, मुस्ती, शिंगडगाव, शिरवळ (जे), तिल्लेहाळ, नवीन विडी घरकुल, बार्शीतील आदर्शनगर, आडवा रस्ता, आझाद चौक, बारबोले प्लॉट, बेदराई गल्ली, भालगाव, भीमानगर, भोयरे, ब्राम्हण गल्ली, बुरुड गल्ली, देशमुख प्लॉट, ढगे मळा, गवळी गल्ली, हांडे गल्ली, हातीज, जामगाव रोड, कापड गल्ली, खानापूर रोड, लहूजी चौक, मळेगाव, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नाईकवाडी प्लॉट, पांगरी, परांडा रोड, रामभाऊ पवार चौक, शेळगाव, शिवाजीनगर, सिद्धार्थनगर, सोलापूर रोड, सौंदरे, सुभाषनगर, तडवळे (यावली), तुळापूर रोड, उपळाई रोड, वैगार, झाडबुके मैदान, पंढरपूर तालुक्‍यातील आढीव, अनिलनगर, भादुले चौक, भोसले चौक, भोसे, बोहाळी, दत्तनगर, देगाव, डोंबे गल्ली, फत्तेपूरकर कॉलनी, फुचिंचोली, गादेगाव, गाताडे प्लॉट, गोविंदपुरा, इसबावी, जुनी पेठ, कालिकादेवी चौक, कराड नाका, करकंब, कवठेकर गल्ली, खेड-भाळवणी, कोर्टी, क्रांती चौक, कुंडलिक हरिदास चौक, लक्ष्मी टाकळी, महावीरनगर, मेंढेगल्ली, ओझेवाडी, पद्मश्री धर्मशाळा, पोलिस लाइन, संतपेठ, सरकोली, उमदे गल्ली, उत्पात गल्ली, विजापूर गल्ली, व्यासनारायण झोपडपट्टी, वांगीकर नगर, माढा तालुक्‍यातील कुर्डुवाडी, कुर्डू, मोडनिंब, पापनस येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी ग्रामीण भागात 283 रुग्ण आढळले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's record again in rural Solapur; 283 infected in a single day