निर्धार कोरोनामुक्‍तीचा ! झोपडपट्ट्यांमधील हातावर पोट असलेल्यांनी थांबविला कोरोना

तात्या लांडगे
Wednesday, 11 November 2020

प्रभागाविषयी ठळक बाबी...

 • आतापर्यंत 366 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह
 • एकूण रुग्णांपैकी 336 जणांची कोरोनावर मात
 • प्रभागातील 15 रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू
 • सध्या प्रभागात आहेत 15 ऍक्‍टिव्ह रुग्ण

सोलापूर : शहरातील नऊ झोपडपट्ट्यांचा प्रभाग, हातावरील पोट असलेल्यांची लोकवस्ती असलेल्या प्रभाग 16 मधील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. सद्यस्थितीत या प्रभागात 15 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 366 रुग्णांपैकी 336 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

प्रभागाविषयी ठळक बाबी...

 • आतापर्यंत 366 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह
 • एकूण रुग्णांपैकी 336 जणांची कोरोनावर मात
 • प्रभागातील 15 रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू
 • सध्या प्रभागात आहेत 15 ऍक्‍टिव्ह रुग्ण

प्रभाग 16 मध्ये पहिला रुग्ण सापडला त्याचाही मृत्यू झाला. चिंतेतील नगरसेवक नरसिंग कोळी, संतोष भोसले, नगरसेविका मिनाक्षी कंपली, फिरदोस पटेल यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत घराबाहेर पडून प्रभागातील नागरिक कोरोनाला बळी पडू नयेत म्हणून आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. प्रभागातील शामा नगर झोपडपट्टी, गुलाब नगर, महात्मा फुले झोपडपट्टी, चिंतलवार वस्ती झोपडपट्टी, मसिहा नगर झोपडपट्टी, दुबई गल्ली झोपडपट्टी, जगजिवनराम झोपडपट्टी, न्यू जगजिवनराम झोपडपट्टी या भागातील नागरिकांचे हातावरील पोट आहे. तरीही त्यांनी नगरसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले. लॉकडाउन काळात प्रभागातील नागरिकांची भूक भागविण्यासाठी नगरसेवकांनी धान्य वाटप करीत शासकीय धान्याचाही लाभ मिळवून दिला. तसेच प्रतिबंधित परिसरात प्रभागातील कोरोना वॉरिअर्सच्या माध्यमातून संशयितांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करुन घेतली. आर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्कचे वाटप करुन नागरिकांना धीर देण्याचेही काम नगरसेवकांनी कले. त्यामुळे आता हा प्रभाग कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करु लागला आहे.

   मोदी परिसर आता कोरोनामुक्‍त
   कोरोनाचा प्रभागात प्रवेश झाल्यानंतर सर्वप्रथम नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्यांना धान्याचा लाभ मिळवून देणे, त्यांना वेळेत उपचार मिळतील, अशी व्यवस्था केली. महापालिकेच्या माध्यमातून मोबाइल क्‍लिनिक, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट घेतली. त्यानंतर नियमांचे पालन करीत नागरिकांनी मास्क वापरणे सुरु केले. आता मोदी परिसर कोरोनामुक्‍त झाला आहे. 
   - मिनाक्षी कंपली, नगरसेविका

   कोरोनामुक्‍त होताहेत झोपडपट्ट्या
   मोदी, शामा नगर, विकास नगर, गुलाब नगर अशा नऊ झोपडपट्ट्यांचा हा प्रभाग आहे. सर्व नगरसेवकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून प्रभागातील नागरिक सुरक्षित कसे राहतील, यादृष्टीने प्रयत्न केले. गरजूंना धान्य वाटप तर प्रभागातील सर्वांना मास्क, आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केले. आता बहुतांश झोपडपट्ट्यांमधून कोरोना हद्दपार झाला असून नागरिकांमुळेच शक्‍य झाले. 
   - नरसिंग कोळी, नगरसेवक


   स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
   Web Title: Coronas stopped by those with slums area