"कोरोना'ची खोटी माहिती शेअर करणाऱ्यांवर होतेय कारवाई (Video)

परशुराम कोकणे
Thursday, 26 March 2020

"कोरोना' पार्श्‍वभूमीवर नागरिकांत भीती निर्माण होईल अशी वेगवेगळी माहिती, छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. शेअर केली जाणारी माहिती काही प्रमाणात खरी असली तरी अनेकजण खात्री न करताना खोटी माहिती पसरवत आहेत.

सोलापूर : "कोरोना' पार्श्‍वभूमीवर व्हॉट्‌स ऍपसह अन्य सोशल मीडियावर खोटी माहिती शेअर करणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, हॅलो आदी सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा वॉच असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 
"कोरोना' पार्श्‍वभूमीवर नागरिकांत भीती निर्माण होईल अशी वेगवेगळी माहिती, छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. शेअर केली जाणारी माहिती काही प्रमाणात खरी असली तरी अनेकजण खात्री न करताना खोटी माहिती पसरवत आहेत. संतोष कांबळे नावाच्या तरुणाने फेसबुकवर "कोरोना' रुग्णांसदर्भात खोटी माहिती शेअर केली. या माहितीमुळे नागरिकांत भीती निर्माण झाल्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक विशेंद्रसिंग बायस यांनी सांगितले. 

पोलिस पथकाकडून वॉच
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोनासंदर्भात वेगवेगळी माहिती शेअर केली जात आहे. सायबर पोलिस ठाण्यातील पथकाकडून सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात येत असून खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 
- विशेंद्रसिंग बायस, 
पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coroners action is against those who share false information