ब्रेकिंग! दरोडा प्रकरणात दोन पोलिसांवर गुन्हा; एकाचे पलायन तर अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट 

तात्या लांडगे
Friday, 21 August 2020

माहिती दडविण्याचा प्रयत्न 

विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा एका गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासांत उघड झाले. त्यानुसार जयप्रकाश कांबळे आणि किर्तीराज अडगळे या दोघांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी कांबळे याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर अडगळे शौच्छालयास जातो म्हणून तिथून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोठ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही अडगळे याला एकटे कसे सोडले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिस ठाण्याकडे नसून माहिती कक्षात मिळेल, असे उत्तर विजापूर नाका पोलिसांकडून देण्यात आले. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित पोलिस ठाण्याकडे संपर्क साधला असता त्यांनीही माहिती नसल्याचे सांगितले.

सोलापूर: विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्यातील सहभाग, जागेचे अतिक्रमण, मालमत्तेचे नुकसान, शिवीगाळ आणि गुन्हा करण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी मार्च 2020 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार हवालदार जयप्रकाश चंद्रशा कांबळे आणि पोलिस नाईक किर्तीराज शाहूराज अडगळे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

विजापूर नाका पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा अवैध वाळू वाहतुकीत हात असल्याने काही दिवसांपूर्वी त्याला निलंबीत करण्यात आले होते. आता पुन्हा दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी नेमके कोण होते, फिर्याद कोणी दिली होती, याची माहिती संबंधित पोलिस ठाणे आणि कंट्रोल रुमला फोन करुनही उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिस आयुक्‍तालयाकडील माहितीनुसार मार्च 2020 मधील गुन्ह्यात (कलम 395, 447, 427, 504 आणि 109 नुसार) दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासांत निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्या अटकेची प्रक्रिया करताना अडगळे शौच्छास जाण्याच्या बहाण्याने पोलिसांना चकवा देऊन पळून गेल्याची नोंद आहे. तर कांबळे याला अटक केली असून तो पोलिस कस्टडी रिमांडमध्ये असल्याचेही नमूद केले आहे.

माहिती दडविण्याचा प्रयत्न 
विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा एका गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासांत उघड झाले. त्यानुसार जयप्रकाश कांबळे आणि किर्तीराज अडगळे या दोघांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी कांबळे याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर अडगळे शौच्छालयास जातो म्हणून तिथून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोठ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही अडगळे याला एकटे कसे सोडले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिस ठाण्याकडे नसून माहिती कक्षात मिळेल, असे उत्तर विजापूर नाका पोलिसांकडून देण्यात आले. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित पोलिस ठाण्याकडे संपर्क साधला असता त्यांनीही माहिती नसल्याचे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against two policemen in robbery case